शेतकरी आंदोलकांचा संताप अनावर; भाजपा नेत्याचे फाडले कपडे

राजस्थान : नवीन कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे गेल्या 7 महिन्यांपासून दिल्लीत तीव्र आंदोलन चालू आहे. संपूर्ण देशात या कायद्यांवरून शेतकरी आपआपल्या राज्यात आंदोलन करत आहेत. अशातच राजस्थानमध्य शेतकरी आंदोलन चालू असताना भाजप नेत्याची आणि शेतकऱ्यांची बाचाबाची होऊन भाजप नेत्याचे कपडे फडल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिलं आहे.

राजस्थानमधील श्रीगंगानगरमध्ये आज दुपारी शेतकरी मोठ्या संख्येनं केंद्रीय कायद्यांचा विरोध करत होते. त्यासाठी घोषणाबाजी देखील केली जात होती. मात्र, त्याच वेळी श्रीगंगानगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर भाजपा एससी मोर्चाची सभा सुरू होती. या सभेसाठी म्हणून मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कैलाश मेघवाल जात असताना वाटेतच शेतकरी मोठ्या संख्येनं आंदोलन करत होते. शेतकरी भाजपाविरोधात घोषणा देत असताना कैलाश मेघवाल त्यांच्यासमोर आले.

त्यामुळे संताप अनावर झालेल्या शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. यावेळी कैलाश मेघवाल यांच्यासोबत आंदोलकांची बाचाबाची झाली. हा वाद टोकाला जाऊन आंदोलकांनी मेघवाल यांचे कपडे देखील फाडले. हा वाद अधिक विकोपाला जाण्याआधीच पोलिसांनी मध्यस्ती करत आंदोलक आणि भाजपा कार्यकर्त्यांना, तसेच मेघवाल यांना बाजूला नेले.

महत्वाच्या बातम्या 

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा