InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

विखेंच्या संपर्कात असलेले काँग्रेसमधील नाराज आमदार भाजप प्रवेशाच्या वाटेवर

राज्य सरकारमधील विद्यमान मंत्री आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेसमध्ये राहून भाजपला मदत केली. त्यानंतर निवडणुकीचा निकाल पुन्हा एनडीएच्याच बाजूने लागल्याचं दिसताच विखेंनी भाजपमध्ये उडी घेतली. त्यानंतर विखेंसोबत काँग्रेसमधील इतरही आमदार जातील, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र त्यावेळी विखे यांनी एकट्यानेच भाजपमध्ये प्रवेश केला. आता मात्र पुन्हा एकदा विखेंच्या संपर्कात असलेले काँग्रेसमधील नाराज आमदार भाजप प्रवेशाच्या वाटेवर असल्याचं दिसत आहे.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला राज्यात मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवामागे अनेक कारणं होती. पण आघाडीतील नेत्यांचं सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेत होत असलेलं आऊटगोईंग हेदेखील या पराभवाचं महत्त्वाचं कारण होतं. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीतही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच पॅटर्नचा अवलंब करण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply