InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

“काँग्रेससाठी जनता मालक, तर भाजपचे मालक अनिल अंबानी आहेत”

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल प्रश्नावरून पुन्हा एकदा भाजपवर जोरदार टीका केली. काँग्रेससाठी जनता मालक आहे, तर भाजपचे मालक हे अनिल अंबानी असल्याची टीका काँग्रेसने केली आहे.

राहुल गांधींनी अमेठीतील लोकांसाठी लिहिलेल्या पत्रात अमेठीतील लोकांना भावनिक साद घालत भाजपवर निशाणा साधला आहे.

“अमेठी हे माझे कुटुंब आहे. अमेठीशी माझे भावनिक नाते आहे”, असे भावनिक विधान राहुल गांधी यांनी यावेळी केले आहे.  “काँग्रेस पक्ष हा देशातील गरिबांसाठी, महिलांसाठी, छोट्या उद्योजकांसाठी काम करण्यास इच्छुक असतो. तर भाजपला गरीब, महिला, छोट्या दुकानदारांसाठी काम करू इच्छितो. परंतु, भाजपला मात्र केवळ १५ ते २० उयोजकांना मालक करायचे आहे. काँग्रेससाठी जनताच मालक आहे. तर भाजपसाठी अनिल अंबानी हे त्यांचे मालक आहेत”, असे राहुल गांधी यांनी या पत्रात म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply