Anil Deshmukh | “…तर तेव्हाच महाविकास आघाडीचं सरकार पडलं असतं” – अनिल देशमुख
Anil Deshmukh | आज (24 मे) माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी एक गौप्यस्फोट केला आहे. यामुळे राजकिय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. तर त्यांच्या या गौप्यस्फोटावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. तसचं जो काही गौप्यस्फोट देशमुखांनी केला आहे याबाबत शरद पवारांना (Sharad Pawar) आणि मला सगळं माहीत असल्याचं देखील संजय राऊत ( Sanjay Raut) म्हणाले.
मला भाजपाकडून दोन वर्षांपूर्वीच ऑफर आली : अनिल देशमुख
माध्यमांशी बोलताना अनिल देशमुख ( Anil Deshmukh) म्हणाले की, भाजप ( BJP) केंद्रीय यंत्रणेचा गैरवापर करत आहे. विरोधी पक्षातील नेत्यांना लक्ष केलं जातं असून त्याच्या विरोधात ईडीच्या कारवाई सुरू केल्या आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) टार्गेट केलं आहे. माझ्यावर देखील 100 कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा आरोप लावून मला जेलमध्ये पाठवण्यात आलं. तसचं मला भाजपाकडून दोन वर्षांपूर्वीच ऑफर आली होती परंतु मी ती नाकारली नाहीतर तेव्हाच महाविकास आघाडी सरकार कोसळलं असतं” असा गौप्यस्फोट देखील अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी यावेळी केला आहे.
Anil Deshmukh Commented On BJP
दरम्यान, त्याच्या या गौप्यस्फोटावर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राऊत म्हणाले की, अनिल देशमुखांकडे (Anil Deshmukh) सर्व पुरावे आहेत आणि त्यांनी हे पुरावे शरद पवारांनाही ( Sharad Pawar) दाखवले आहेत. तसचं जे काही अनिल देशमुख (Anil Deshmukh) सांगत आहेत याबाबद्दल मला पूर्ण कल्पना आहे. अनिल देशमुखांवर कोणत्या प्रकारचा दबाव आणण्यात आला होता? भाजपाने काय ऑफर दिली होती? याबाबत माहिती असल्याचं संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटलं. याचप्रमाणे राऊत पुढे म्हणाले की, अनिल देशमुख ( Anil Deshmukh) यांनी भाजपची ती ऑफर नाकारली म्हणून त्यांच्या पाठीमागे चौकश्या सुरू झाल्या. खोटे आरोप करून त्यांना तुरुंगात टाकण्यात आले. हे फक्त त्याच्याच बाबतीत नाही तर विरोधी पक्षातील अनेक जेष्ठ नेत्याच्या बाबत घडत आहे. असं देखील संजय राऊत ( Sanjay Raut) म्हणाले.
महत्वाच्या बातम्या-
- Sanjay Shirsat | शिंदेंनी मंत्री केले नाही तर पुन्हा मातोश्रीची वाट धरणार? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगीतलं…
- Ashish Deshmukh | आशिष देशमुख यांची काँग्रेसमधून हकालपट्टी
- Bhagwant Mann | राज्यभवन भाजपचं हेडऑफिस तर भाजप नेते अधिकारी – भगवंत मान
- MS Dhoni | जगात भारी ‘Thala’ ची एन्ट्री! DJ झेननी सांगितला अवाक करणारा किस्सा
- Rahul Gandhi | “… हा देशातील सर्वोच्च घटनात्मक पदाचा अपमान आहे”; राहुल गांधींचं ट्विट चर्चेत
Original NEWS SOURCE – https://bit.ly/45tGMbR
Comments are closed.