Anil Deshmukh | सरकार आपल्याच एजन्सीकडून उदोउदो करून घेत आहे; अनिल देशमुख यांचा शिंदे-फडणवीस सरकारवर घणाघात
Anil Deshmukh | नागपूर: गेल्या काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री पदाबाबत सर्व्हे करण्यात आला होता. या सर्व्हेमध्ये एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मुख्यमंत्री म्हणून पसंती मिळाली होती. या सर्व प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी सरकारवर टीका केली आहे. हे सर्व प्रकार बंद करून जनसामान्यांच्या प्रश्नकडं लक्ष द्या, असं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.
Pay attention to people’s problems – Anil Deshmukh
अनिल देशमुख (Anil Deshmukh) म्हणाले, “महाराष्ट्रामध्ये जे काही आरोप प्रत्यारोप होत आहे, ते आता बंद झाले पाहिजे. हा प्रकार बंद करून जनसामान्यांच्या अडचणीकडं लक्ष द्यायला हवं. शिंदे गटानं त्यांच्या एजन्सीकडून सर्वे केला. त्यानंतर भारतीय जनता पक्षानं एक सर्वे केला आणि त्यांनी त्यांची आकडेवारी समोर आणली.”
पुढे बोलताना ते (Anil Deshmukh) म्हणाले, “आपल्या एजन्सीला कामाला लावायचं आणि आपलाच उदोउदो करायचा. आपला उदोउदो करून जनतेची दिशाभूल करायची, हा प्रयत्न राज्य सरकारकडून होत आहे.
दरम्यान, न्यूज एरीना इंडिया या संस्थेच्या सर्व्हेनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 25 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर महाराष्ट्रात भाजपाला सव्वाशे जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना मुख्यमंत्री पदासाठी 35 टक्के लोकपसंती मिळत असल्याचं या सव्हेतून (Anil Deshmukh) सांगण्यात आलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis | राज्याचा पुढचा मुख्यमंत्री कोण? देवेंद्र फडणवीस म्हणतात…
- Vijay Wadettiwar | जे काम देशाच्या पंतप्रधानांनी करायला हवं ते राहुल गांधी करत आहे; विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
- Raj Thackeray | भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना हिंदुस्तानात व्हावा हे न पटणार आहे; मनसे नेत्याची संतप्त प्रतिक्रिया
- Sanjay Raut | देवेंद्र फडणवीस कदाचित झोपेत बडबडत असतील; संजय राऊतांचा फडणवीसांना खोचक टोला
- Sanjay Raut | केंद्र सरकारनं पाकिस्तानला दम देण्यापेक्षा चीनला दम घ्यावा – संजय राऊत
Original NEWS SOURCE – https://bit.ly/44ivNAK
Comments are closed.