अनिल देशमुख आणि एकनाथ खडसे भेट ; भाजप – राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची तोबा गर्दी

रावेर:भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि राज्याचे गृहमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांची आज रावेरच्या शासकीय विश्रामगृहात भेट झाली.त्यावेळी विश्रामगृहाबाहेर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रच्चंड गर्दी केली होती. या देशमुख आणि खडसे यांच्या भेटीतून काही नवे घडणार का?याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

त्यानंतर विश्रामगृहातून हे दोन्ही नेते रावेर हत्याप्रकरणातील पीडित कुटुंबाच्या भेटीसाठी रवाना झाले. काही दिवसांपूर्वी घडलेल्या रावेर हत्याप्रकरणात आतापर्यंत तीन जणांना अटक करण्यात आली आहे. सध्या हे प्रकरण चांगलेच गाजत आहे. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अनिल देशमुख जातीने रावेरमध्ये आले आहेत.

भाजप नेते एकनाथ खडसे हे घटस्थापनेच्या मुहूर्तावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र, सध्या तरी खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा हा मुहूर्त चुकला आहे. एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादी राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधानपरिषदेवर पाठवणार ते खडसे यांना महाविकासआघाडी सरकारमध्ये कृषिमंत्रीपद मिळणार, अशा चर्चा रंगल्या होत्या.पण या सगळ्या चर्चा फुसका बर असल्याचे उघड झाले आहे.

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा