“अनिल देशमुखांना लवकरच अटक होईल; ईडीला सर्व पुरावे मिळाले”

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. या प्रकरणात अनिल देशमुख यांच्या घरी नागपूरमध्ये ईडीने छापे टाकले होते. त्यातच आता अनिल देशमुख यांच्याविरूद्ध उच्च न्यायालायात याचिका दाखल करणाऱ्या  अॅड. जयश्री पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

“माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधातील सर्व पुरावे आता ईडीच्या हाती लागले आहेत. त्यामुळे अनिल देशमुख यांनाही अटक होईल. देशमुख यांच्या दोन सहकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. त्याचबरोबर अनिल देशमुखांनाही ईडीने बोलावलं आहे.  त्यामुळे त्यांनाही अटक होईल,” अशी प्रतिक्रिया अॅड. जयश्री पाटील यांनी दिली आहे.

“मला धमकीचे फोन आले. त्याबाबतचे पुरावे देखील मी दिले आहेत. या धमकी देण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांचा हात आहे. त्यांनी माझ्यावर कशाप्रकारे दबाव आणण्याचा प्रयत्न केला, त्याबाबत सविस्तर माहिती मी ईडीला दिलेली आहे. माझा देशाच्या न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. अनिल देशमुख यांच्यावर कुणाचीही हात असला तरी त्यांना अटक होईल. माझ्याकडे बारमालकांनी पुरावे दिले होते, ते मी ईडीला दिले आहेत,” असंही जयश्री पाटील यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा