Anil Parab | किरीट सोमय्या सुपारी घेऊन काम करतात ; अनिल परब यांचा आरोप

Anil Parab | मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somayya) आणि अनिल परब (Anil Parab) यांच्यातील सामना पुन्हा रंगला आहे. किरीट सोमय्या हातोडा घेऊन दापोली दौऱ्यावर गेले आहेत. सोमय्या आज दापोली पोलीस स्टेशनला भेट देऊन साई रिसॉर्ट पाडकामाची माहिती घेणार आहेत. त्यामुळे दापोलीतील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघणार आहे. दरम्यान अनिल परब यांनी किरीट सोमय्या यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

अनिल परब म्हणाले, “किरीट सोमय्या हातोडा घेऊन गेले पण हा स्टंट नौटंकी आहे. किरीट सोमय्या यांची नौटंकी आपण आज बघत नाही. असाच हातोडा त्यांनी राणे साहेबांच्या घरी घेऊन जावा. सुभाष देशमुख यांचे घर देखील बेकायदेशीर आहे. आमच्याकडे यादी आहे कीती लोकांची घरे बेकायदेशीर आहेत. केवळ मला बदनाम करायचं आणि अडकवायचं, यासाठी किरीट सोमय्यांचे उद्योग चालू आहेत.”

किरीट सोमय्या सुपारी घेऊन काम करत आहेत. त्यांना सुपारी दिली जाते. जे शिंदे गटात गेले त्यांच्याबद्दल बोलायची किरीट सोमय्यांची हिमंत आहे का?. हिंमत असेल तर सोमय्यांनी दाखवावी. या रिसॉर्टशी माझा संबंध नाही. काल देखील माझ्यावर एक खोटा खटला दाखल केला गेला. ४२० कलम त्यात लावण्यात आले, असे अनिल परब म्हणाले.

महत्वाच्या बातम्या : 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.