Anil Parab | नोटाला एवढी मतं का मिळाली? अनिल परबांनी दिलं उत्तर, म्हणाले…

Anil Parab | मुंबई : अवघ्या राज्याचं लक्ष लागलेल्या अंधेरी पोट निवडणूकांचा (Andheri By Election) निकाल जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने लढणाऱ्या ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांचा विजय झाला आहे. मात्र, या निवडणूकीत नोटाला देखील मोठ्या प्रमाणात मतदान करण्यात आलं आहे. यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील नेते अनिल परब (Anil Parab) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत भाजपने मुरजी पटेल यांना माघार घ्यायला सांगितली असली तरी नोटा या पर्यायाला मतदान करण्यासाठी पडद्यामागून प्रचार केला. तरीही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला. यावरुन मुंबईकरांच्या मनात काय आहे, हे दिसून आलं. या पोटनिवडणुकीने मुंबईतील जनता उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी असल्याचे सिद्ध केले. तसेच महाविकास आघाडी एकत्र आली तर काय करु शकते, असं अनिल परब म्हणाले.

भाजपच्या मुरजी पटेल यांनी पोटनिवडणुकीतू माघार घेतली होती. यासाठी आम्ही भाजपचे आभारही मानले होते. पण एका बाजूने उमेदवार मागे घ्यायचा आणि दुसरीकडे नोटाचा प्रचार करायचा, हे योग्य नाही. भाजपने ऋतुजा लटके यांना पाठिंबाही दिला नव्हता. अंधेरी पूर्व निवडणुकीत झालेला नोटाचा प्रचार, ही बाब खटकण्यासारखी होती, असं परब म्हणाले.

दरम्यान, भाजपने उमेदवार मागे घेतला असला तरी त्यांनी नोटाला पर्याय निवडण्याचं आवाहन केलं होतं. याबाबतचा एक व्हिडीओ देखील समोर आला होता. नागरिकांनी नोटाला का जास्त मतदान केलं? याबाबतचा प्रश्न तुम्ही मतदारांना विचारला पाहिजे की त्यांनी नोटाचं बटण का दाबलं, असं ऋतुजा लटके यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.