अनिल परब फक्त दोन महिन्यांचे पाहुणे; किरीट सोमय्यांचे वक्तव्य

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मोठं विधान केलं आहे. परिवहन मंत्री अनिल परब हे केवळ दोन महिन्यांचे पाहुणे आहेत. त्यांची मंत्रिमंडळातील गच्छंती अटळ आहे, असा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे.किरीट सोमय्या बदलापूरमध्ये रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमाला आले होते. या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा दावा केला आहे.

अनिल देशमुख यांच्यानंतर आता अनिल परब यांचा नंबर लागणार आहे. परब केवळ दोन महिन्यांचेच पाहुणे आहेत. परब यांच्यावर वेगवेगळ्या घोटाळ्याचे आरोप आहेत. या सगळ्या घोटाळ्यांची विविध यंत्रणांमार्फत चौकशी सुरू असून राज्यपालांनीही परब यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे परब हे आता 2 महिन्यांचे पाहुणे असून सरकारनेच आता त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे.

यावेळी मराठा आरक्षणावरून सोमय्या यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. ठाकरे सरकार बनवाबनवी आणि फसवाफसवी करण्यात माहीर आहे. त्यांनी मराठा समाजाची फसवणूक केली आहे. अंतर्गत मतभेदामुळे ठाकरे सरकारने मराठा आरक्षणाची बाजू कोर्टात व्यवस्थित मांडली नाही. त्यामुळे मराठा समाजाचं आरक्षण गेलं, असं सांगतानाच केंद्र सरकार आणि भाजप मराठा आरक्षणाच्या बाजूने असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा