“अनिल परब कोणत्या वसुलीत इतके गुंतलेत की, त्यांना एसटी कर्मचाऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही?”

मुंबई : ऐन दिवळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाचं हत्यार उपसलं आहे. आज मध्यरात्री 12 पासून एसटी कर्मचारी बेमुदत संपावर जात आहेत. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण होत नाही तोपर्यंत आंदोलन चालूच राहणार आहे. त्यावरुन भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी महाविकास आघाडी सरकार व परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर निशाणा साधला आहे.

या संदर्भात केशव उपाध्ये यांनी ट्वीट केले आहे. त्यामध्ये ते म्हणाले की, ”च्या 306 कर्मचाऱ्यांचा कोविड मध्ये मृत्यू २५ कर्मचाऱ्यांची आत्महत्या पण उद्धव ठाकरे यांचे सरकार मात्र थंड आहे. परिवहन मंत्री सध्या कोणत्या वसुलीत इतके गुंतलेत की, त्यांना ST कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही? मुळात अनिल परब आहेत कुठे?”, असा सवाल उपाध्ये यांनी केला आहे.

दरम्यान, आमदार गोपीचंद पडळकर यांनी एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार, असा इशारा सरकारला दिला आहे. तसेच, यादरम्यान आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली तर मी स्वत: परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घरासमोर आंदोलन करणार असल्याचं पडळकर यांनी जाहीर केलंय.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा