ANIS | मुख्यमंत्र्यांनी भविष्य पाहिल्याच्या चर्चेनंतर अंधश्रद्धा निर्मूलन संस्थेची प्रतिक्रिया; म्हणाले,

ANIS | मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी काल सपत्नीक शिर्डी येथील साईबाबा मंदिरात दर्शन घेतलं. त्यानंतर ते नाशिकच्या दिशेने निघाले. मुख्यमंत्र्यांनी सिन्नरमधील मिरगाव येथील एका ज्योतिष्याकडे हात दाखवल्याची चर्चा आहे. यावरून राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. यावर आता अंधश्रद्धा निर्मूल संस्थेने (ANIS) प्रतिक्रिया दिली आहे.

“एकनाथ शिंदे यांनी भविष्य जाणून घेतले असेल तर आम्ही त्यांचा निषेध करतो. शिंदे यांच्यासारख्या संविधानिक पदावर बसलेल्या नेत्याने भविष्य पाहिले असेल तर त्यातून चुकीचा संदेश जात आहे”, अशी भूमिका अनिसने (ANIS) घेतली आहे.

“जोतिष थोतांड नसल्याचे सिद्ध करणाऱ्याला आम्ही २१ लाख रुपयांचे बक्षीस देण्याचे यापूर्वी जाहीर केलेले आहे. मात्र हे आव्हान स्वीकारण्यास कोणीही पुढे येत नाही. म्हणूनच मुख्यमंत्र्यांनी ज्योतिषाकडे जाणे म्हणजे समाजात चुकीचा संदेश पसरविण्यासारखे आहे,” अशी प्रतिक्रिया अंनिसचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी दिली आहे. पुढे ते म्हणाले, ज्योतिष हे काही शास्त्र नाही. ती स्वप्न विकण्याची कला आहे. जोतिष हे थोतांड आहे, हे आम्ही वारंवार सिद्ध केलेले आहे.

मुख्यमंत्रीपदावर असलेल्या व्यक्तीने अशा वैज्ञानिक दृष्टीकोन नसलेल्या गोष्टीचा आधार घेतला असेल, तर ती अंधश्रद्धाच आहे. आकाशातील गृह मानवी जीवनाव परिणाम करतात. कर्मकांड करून हा परिणाम बदलता येतो, हा दावा चुकीचा आहे,” अशी प्रतिक्रिया अंनिसचे राज्य प्रधान सचिव डॉ. टी.आर.गोराणे यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.