Anjeer | केसांची काळजी घेण्यासाठी अंजीराचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Anjeer | टीम महाराष्ट्र देशा: आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे आणि खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयींमुळे केसांना अनेक समस्यांना (Hair problems) सामोरे जावे लागते. केसांच्या समस्यांवर मात करण्यासाठी आणि केसांची काळजी घेण्यासाठी लोक वेगवेगळे पर्याय शोधत असतात. यासाठी बहुतांश लोक हेअर ट्रीटमेंट किंवा बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या केमिकलयुक्त उत्पादनांचा वापर करतात. मात्र, या गोष्टी केसांसाठी हानिकारक ठरू शकतात. त्यामुळे केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही अंजिराचा वापर करू शकतात. यासाठी तुम्हाला पाण्यामध्ये दोन ते तीन अंजीर रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावे लागेल. त्यानंतर सकाळी तुम्हाला ते अंजीर सोलून बारीक करून घ्यावे लागेल. त्यानंतर अंजिराच्या मिश्रणामध्ये तुम्हाला तीन चमचे दही, एक चमचा मध आणि गुलाब जल मिसळून पेस्ट तयार करून घ्यावी लागेल. ही पेस्ट तुम्हाला साधारण वीस मिनिटे केसांवर लावून ठेवावी लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचे केस स्वच्छ धुवावे लागेल. आठवड्यातून दोन ते तीन वेळा याचा वापर केल्याने केसांच्या खालील समस्या सहज दूर होऊ शकतात.

केस गळती थांबू शकते (Hair loss can be stopped-Anjeer For Hair)

केस गळतीच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी अंजिराची पेस्ट उपयुक्त ठरू शकते. अंजिरामध्ये आढळणारे गुणधर्म केसांना पोषण आणि मजबूत करण्याचे काम करतात. यामध्ये आढळणारे विटामिन ई आणि सी केस गळतीच्या समस्येवर मात करण्यास मदत करू शकतात.

कोंडा दूर होतो (Removes dandruff-Anjeer For Hair)

तुम्ही जर कोंड्याच्या समस्येपासून त्रस्त असाल, तर अंजीर तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. अंजीरामध्ये आढळणारे गुणधर्म टाळू आणि केसांमध्ये साचलेली घाण काढून टाकण्यास मदत करतात. अंजिराचा हेअर पॅक वापरल्याने केसातील कोंडा सहज दूर होऊ शकतो.

केसांच्या वाढीस चालना मिळते (Promotes hair growth-Anjeer For Hair)

केसांची वाढ वाढवण्यासाठी अंजीर फायदेशीर ठरू शकते. अंजिरामध्ये आढळणारे गुणधर्म केसांची वाढ वाढवण्यास मदत करतात. त्याचबरोबर हा हेअर पॅक वापरल्याने केस चमकदार आणि मजबूत होऊ शकतात.

अंजिराचा वापर करून केसांच्या वरील समस्या सोडवता येऊ शकतात. त्याचबरोबर सुंदर आणि जाड आयब्रोसाठी तुम्ही खालील टिप्स फॉलो करू शकतात.

आवळा (Amla-Eyebrow Care)

आवळा आपल्या आरोग्यासोबतच आयब्रोसाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. यासाठी तुम्हाला एक ग्लास पाण्यामध्ये पाच ते सहा आवळ्याचे तुकडे उकळून घ्यावे लागेल. हे मिश्रण थोडे घट्ट झाल्यानंतर तुम्हाला ते कापसाच्या साहाय्याने साधारण वीस मिनिटे आयब्रोवर लावून ठेवावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमच्या आयब्रो सामान्य पाण्याने धुवाव्या लागतील. आवळ्याच्या मदतीने आयब्रो काळ्या आणि दाट होऊ शकतात.

कांदा (Onion-Eyebrow Care)

आयब्रोची काळजी घेण्यासाठी कांदा उपयुक्त ठरू शकतो. यासाठी तुम्हाला साधारण वीस मिनिटे कांद्याचा रस आयब्रोवर लावून ठेवावा  लागेल. वीस मिनिटानंतर तुम्हाला तुमचं चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. कांदा केसांच्या वाढीस प्रोत्साहन देतो. त्यामुळे आयब्रोची काळजी घेण्यासाठी कांदा फायदेशीर ठरू शकतो.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या