…अन मोदी म्हणाले, “कोरोनाचे पॉझिटिव्ह केसेस वाढवण्यावर भर द्या!”

कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे नऊ जिल्ह्य़ांतील ४६ जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. पण, अधिकाऱ्यांशी संवाद साधताना मोदींनी एक गंभीर चूक केली. त्यात ते देशामध्ये पॉझिटिव्ह केस वाढल्या पाहिजेत असं म्हणाले. यावरून त्यांच्यावर काँग्रेसने निशाणा साधला.

पंतप्रधान मोदी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करतानाच एक व्हिडीओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झालाय. यामध्ये पंतप्रधान मोदी, “वेगाने पॉझिटिव्ह रुग्णसंख्या वाढो, वेगाने चाचण्यांची संख्याही वाढवी या साऱ्या गोष्टींवर आपण भर दिला पाहिजे,” असं म्हणताना दिसतात. काँग्रेसने हा व्हायरल व्हिडीओ शेअर करत मोदींवर निशाणा साधालाय आणि मोदी पॉझिटिव्ह रुग्णसंख्या वाढवण्याच्या गोष्टी करत आहेत. डोक्यात जे आहे तेच त्यांच्या जीभेवर आलं आहे, असा टोला लगावलाय.

“प्रधानमंत्री पॉझिटिव्ह रुग्णसंख्या वाढवण्याचा प्रयत्न करण्यासाठी केवळ सांगत नसून पश्चिम बंगालच्या निवडणूक प्रचारांमध्ये गर्दी जमा करुन त्यांनी याचं उदाहरणही दिलं आहे की पॉझिटिव्ह रुग्णसंख्या कशी वाढवायची. तसंही जीभेवर तीच गोष्ट येते जी डोक्यात सुरु असते,” असं काँग्रेसने आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.

काँग्रेसच नाही तर इतर काही अकाऊंटवरुनही मोदींचा हा व्हिडीओ व्हायरल झाला असून अनेकांनी पंतप्रधानांवर यावरुन टीका केलीय.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा