दिल्लीतील आंदोलनाला उपस्थित राहावं या शेतकऱ्यांच्या मागणीवर अण्णा हजारे म्हणाले, उपस्थित राहिलो असतो पण…

अहमदनगर : २२ दिवस शेतकरी थंडीत कुडकुडत तीन कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरयाणातील शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर ठिय्या मांडला आहे. याबाबत सरकारशी चर्चेच्या फेऱ्या होऊनही त्यातून काहीच निष्पन्न होत नाही, हे चित्र असल्याने शेतकरी संघटनांनी मागे न हटण्याचा ठाम निर्णय घेतला आहे.

यानंतर आता शेतकऱ्यांच्या या आंदोलनात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सहभागी व्हावं. याकरता दिल्लीतील 6 शेतकऱ्यांचं एक शिष्टमंडळ अण्णांच्या भेटीसाठी काल राळेगणसिद्धीत दाखल झाले होते.

मात्र, दिल्लीतील कडाक्याची थंडी, आपले वय, सुरक्षा आणि कोरोनाची स्थिती लक्षात घेता हे शक्य होणार नसल्याचे सांगत हजारे यांनी त्यांची समजूत काढली. मात्र, आपल्या जुन्या मागण्यांसाठी दिल्लीत आंदोलन करण्याची परवानगी हजारे यांनी सरकारकडे मागितली आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांचं आंदोलनाचा विषय आता राष्ट्रापुरता मर्यादित राहिलेला नसून तो आंतरराष्ट्रीय होतोय. या आंदोलनावर सरकारने त्वरित तोडगा काढून शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या पाहिजेत.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.