जितेंद्र आव्हाडांच्या खोचक शुभेच्छांना अण्णा हजारेंचं रोखठोक उत्तर; म्हणाले….

मुंबई : जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा १५ जूनला ८४व्या वाढदिवस झाला. वाढदिवसाच्या दिवशी अनेकांनी अण्णांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शुभेच्छा देताना अण्णा हजारेंना खोचक असा टोला हाणला होता. त्यावर अण्णा हजारेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.

“प्रिय अण्णा, प्रचंड महागाई ,पेट्रोल-गॅस-डिझेल-खाद्यतेलाचे गगनाला भिडलेले भाव, ढासळती अर्थव्यवस्था, कोरोनामुळे कोलमडलेली आरोग्यव्यवस्था,वाढती सामाजिक दरी, चीनसोबत सीमेवरील तणावाबद्दल नाही तर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी हा मेसेज होता,” असं जितेंद्र आव्हाडांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं. यावर अण्णांनी उत्तर दिलं आहे.

“मी एक सामान्य माणूस आहे. जनतेची सेवा करतो पण तुम्ही तर मंत्री आहात. या प्रश्नांसाठी मग तुम्ही काय केलं?, प्रत्येक प्रश्नासाठी हजारे यांनीच आंदोलन करावं का?, तुम्हीही जनतेचे सेवक आहात, मग तुम्ही जनतेसाठी काम का करत नाही,” असा सवाल अण्णा हजारेंनी आव्हाडांना केला आहे.

अण्णा हजारेंनी दिलेल्या प्रत्युत्तरावर जितेंद्र आव्हाड काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा