‘कुठल्याही निवडणुका जाहीर होण्याआधी आमची तारीख जाहीर!’ : केदार शिंदे

मुंबई : प्रसिद्ध दिग्दर्शक म्हणजेच केदार शिंदे लवकरच एक नवीन कथा घेऊन प्रेक्षकांना भेटायला येणार आहेत. ‘बाईपण भारी देवा’ असे या आगामी चित्रपटाचे नाव आहे. आता सोशल मीडिया पोस्टद्वारे केदार शिंदे यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख सांगितली आहे.

केदार शिंदे यांनी ट्वीट करत ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख सांगितली आहे. “कुठल्याही निवडणुका जाहीर होण्याआधी आमची तारीख जाहीर! ‘बाईपण भारी देवा.’ २८ जानेवारी २०२२ पासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात!” असे ट्वीट त्यांनी केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी चित्रपटाचे पोस्टर देखील शेअर केले आहे.

दरम्यान ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटात कौटुंबिक विषय मांडण्यात येणार आहेत. या चित्रपटात कोण कोणते कलाकार आहेत? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना अजून काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा