InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

भाजपमध्ये जाणाऱ्यांची नावे जाहीर करा ; अजित पवारांचं विखेंना आव्हान

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून देशभरात काँग्रेसची नेतेमंडळी, आमदार भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचं पाहायला मिळत आहे. कर्नाटकमधल्या 14 आमदारांनी राजीनामे देऊन भाजप प्रवेशाची तयारी चालवली आहे. गोव्यात 10 आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आता पश्चिम बंगालमध्ये देखील तब्बल 107 विरोधी आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचं वक्तव्य भाजपचे मुकुल रॉय यांनी केलं आहे. महाराष्ट्रात माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीच थेट भाजपचा रस्ता धरल्यानंतर त्यांच्या पाठोपाठ इतरही काही काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते भाजपवासी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तशी शक्यताच राधाकृष्ण विखे पाटील यांनी वर्तवली होती. मात्र, त्यांच्या या शक्यतेलाच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी खुलं आव्हान दिलं आहे.

काँग्रेस व राष्ट्रवादीचे काही आमदार भाजपच्या वाटेवर असल्याच्या राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वक्तव्याचा अजित पवार यांनी आज पिंपरी चिंचवडमध्ये समाचार घेतला. वाटेवर असणाऱ्यांची नावे सांगा, असे आव्हान त्यांनी दिले. तसेच ज्यांना जायचे असेल, ते जातील, असेही ते म्हणाले.आगामी विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे काहीजण माझ्या संपर्कात आहेत. त्यातल्या काहींना युतीत प्रवेश करायचा आहे.

Loading...

- Advertisement -

पण याबद्दलचा अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठीच घेतील’, असं वक्तव्य शुक्रवारी गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोलापुरात केलं होतं. त्यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार यांनी त्यांना खुलं आव्हान दिलं आहे. ‘भाजपच्या वाटेवर कशाला? जे आमदार जाणार आहेत, त्यांची नावंच विखे पाटलांनी जाहीर करावीत. उद्या कुणीही काहीही म्हणेल. जे जायचे असतील, ते जातील’, असं अजित पवार म्हणाले आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये एका खासगी हॉटेलच्या उदघाटन प्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Loading...

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.