रजनीकांत यांच्या आगामी चित्रपटाची घोषणा,ट्विटरवर #Rajini168 ट्रेंड

साउथ सुपरस्टार रजनीकांत यांच्या नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. ‘थलाइवर १६८’ या नव्या चित्रपटाची घोषणा होताच सोशल मीडियावर या चित्रपटाची चांगलीच चर्चा होत आहे. चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आल्यानंतर #Rajini168 ट्विटरवर ट्रेंड होण्यास सुरुवात झाली आहे.

दिग्दर्शक शिवा ‘थलाइवर १६८’ या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. सन पिक्चरने आपल्या ट्विटरवरुन याबाबत घोषणा केली आहे. ‘थलाइवर १६८’ चित्रपटाची घोषणा करत शिवा यांनी एक मोशन पोस्टर शेअर केलं आहे.

एंथरन आणि पेट्टा यांसारख्या सुपरहिट चित्रपटांनंतर आता तिसऱ्यांदा सन पिक्चरसह रजनीकांत पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

Loading...

भारत सरकारकडून २००० मध्ये रजनीकांत यांना पद्मभूषण आणि पद्म विभूषण पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. १२ डिसेबंर १९५० रोजी रजनीकांत यांचा जन्म झाला. त्यानंतर १९७५ मध्ये ‘अपूर्व रागंगल’ या चित्रपटातून त्यांनी आपल्या करियरची सुरुवात केली.

‘अंधा कानून’, ‘इंसाफ कौन करेगा’, ‘कबाली’, ‘शिवाजी द बॉस’ यांसारख्या चित्रपटातून त्यांनी जबरदस्त भूमिका साकारल्या आहेत. आता Thaliver 168 मधून त्यांना प्रेक्षकांची कितपत पसंती मिळणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.