जातीवाचक शब्दाचा उल्लेख केल्याने वादाच्या भोवऱ्यात अडकली आणखीन एक अभिनेत्री

जातिवाचक शब्दांचा वापर केल्याने काही दिवसांपूर्वीच ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ शो मधील बबीताजी म्हणजे अभिनेत्री मुनमुन दत्ताला लोकांचा रोषाला सामोरे जावे लागले. तिच्यावर एफ.आय.आरही दाखल करण्यात आली. हे प्रकरण शांत होण्याआधीच आता अभिनेत्री युविका चौधरीन जातिवाचक शब्दांचा उल्लेख केल्याने नेटकरी आणखी संतापले आहेत.

रोडिस् फेम प्रिन्स नेरुलाची पत्नी अभिनेत्री युविका चौधरी चांगलीच चर्चेत आलीय. युविका सोशल मीडियावर अनेक व्लॉग शेअर करत असते. यातील तिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकऱ्यांकडून या व्हिडीओवर संताप व्यक्त केला जातोय.

या व्हिडीओत युविकाचा पती प्रिन्स एका खुर्चीत बसलेला दिसतोय. तो हेअर स्टाईल करत असताना युविका हा व्हिडीओ शूट करताना दिसतेय. समोर आरसा असल्याने युविका व्हिडीओ शूट करताना स्पष्ट दिसतेय. यावेळी ती नेहमी व्हिडीओ शूट करताना मला छान तयार होता येत नाही असं बोलतेय. “नेहमी मी व्लॉग बनवते. तेव्हा मी का नेहमी ** सारखी येऊन उभी राहते. मला वेळचं मिळतं नाही की मी स्वत: ला व्यवस्थित दाखवू शकेन. मला खूप वाईट वाटतंय आणि हा मला व्लॉगसाठी वेळ देत नाही.” असं ती यात म्हणतेय. या व्हिडीओच्या सुरुवातीलाच युविकाने जातिवाचक शब्दांचा उल्लेख केलाय.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा