शरद पवारांचा भाजपाला आणखीन एक मोठा धक्का

मुंबई : विधानससभा २०१९ च्या आधी राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधून मोठ्याप्रमाणावर भाजपमध्ये पक्षांतर झाले होते. यामध्ये अनेक दिग्ग्ज नेत्यांचा समावेश होता. मात्र यानंतर आता भाजपमधून गळती सुरु झाल्याचं दिसून येत आहे. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तर मराठवाड्यातील जयसिंगराव पवार यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
यानंतर अनेक छोट्या मोठ्या प्रवेश प्रकिया चालू आहेत. तर यावेळी विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर निवडणुकांमध्ये महाविकासाआघाडी एकत्र लढल्याने भाजपाला पराभवाला सामोरी जावं लागलं आहे. यानंतर मुंबईत भाजपाला आणखीन एक धक्का बसला आहे.
नवी मुंबईतील नगरसेविका तनुजा मढवी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडला. अवघ्या काही दिवसांवर नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुका आल्या असतानाच भाजपमधील अंतर्गत वाद उफाळून आल्याने अनेक नगरसेवकांनी भाजपला रामराम ठोकून शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसची वाट धरल्याचे समोर येत आहे.
महत्वाच्या बातम्या
- प्रजासत्ताकदिनी दिल्लीत शेतक-यांची ट्रॅक्टर रॅली
- शेतकऱ्यांचे आंदोलन चुकीचे आहे, शरद पवारांनी पाठिंबा देण्याऐवजी कायद्यात बदल सुचवावा
- सिंधुताई सपकाळ आणि गिरीश प्रभुणे यांना पद्मश्री घोषित