पराभवाच्या धक्क्यानंतर अजून एक धक्का ; श्रेयस अय्यरला ‘या’ कारणासाठी भरावा लागतोय बारा लाखांचा दंड !

आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादकडून पराभवाचा धक्का मिळाल्यानंतर ‘दिल्ली कॅपिटल्स’चा कर्णधार श्रेयस अय्यरला आणखी एक झटका मिळाला आहे. श्रेयसला स्लो ओव्हर-रेट कायम राखल्याबद्दल बारा लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

आयपीएलच्या नियमावलीनुसार किमान ओव्हर रेट राखण्यासंबंधी नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी श्रेयसकडून दंड आकारला जाणार आहे. आयपीएलच्या यंदाच्या सिझनमध्ये ‘सनरायझर्स हैदराबाद’ने पहिल्यांदाच नियम मोडला.

“अबू धाबी येथे 29 सप्टेंबर 2020 रोजी ‘ड्रीम 11 इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2020’ तील सनरायझर्स हैदराबादविरुद्ध झालेल्या सामन्यादरम्यान ‘दिल्ली कॅपिटल्स’ने स्लो ओवर रेट कायम ठेवल्याबद्दल कर्णधार श्रेयस अय्यर यांना दंड ठोठावण्यात आला आहे” असे आयपीएलने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या :-

बिग बॉस १४च्या घरात वादग्रस्त राधे मा ची एन्ट्री !

कंगना प्रकरणावरून उच्च न्यायालयाने संजय राऊतांना सुनावले खडे बोल

पुढील साडेचार वर्षे पहाटेचा एकही राजकीय मुहूर्त पंचांगात नाही ; सेनेचा चंद्रकांत दादांना टोला

चिंतेत वाढ करणारी बातमी ; देशात कोरोना रुग्णांची संख्या ६२ लाखांवर

एकनाथ खडसेंची भाजपाला सोडचिठ्ठी? पक्षांतराची ‘ती’ ऑडिओ क्लीप व्हायरल

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.