“अजून एक काश्मिर तयार होत आहे.”: अभिनेत्री कंगना रणौत

पश्चिम बंगालमध्ये ममता बनर्जींच्या सरकारला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. यावर आपल्या वादग्रस ट्विटमुळे कायम चर्चेत असणारी अभिनेत्री कंगना रणौतने परत एक वादग्रस ट्विट केलं आहे.

आपल्या ट्विटमध्ये ती म्हणते, “बांग्लादेशी आणि रोहिंग्या हीच ममताची सर्वात मोठी ताकद आहे. आणि जो ट्रेंड आहे त्यावरुन तर असंच दिसत आहे की तिथे हिंदू बहुसंख्य नाहीत. उपलब्ध माहितीनुसार, बंगाली मुस्लिम हा भारतातला सर्वाधिक गरीब आणि वंचित घटक आहे. छान, अजून एक काश्मिर तयार होत आहे”. कंगनाचं हे ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनेकांनी तिच्या या ट्विटवर कमेंट्स केल्या आहेत.

पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ आणि आसाम ही चार राज्ये तसेच पुदुच्चेरी केंद्रशासित प्रदेशात विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. सर्वाधिक चुरस पश्चिम बंगालमध्ये आहे. ममता बॅनर्जी यांची तृणमूल काँग्रेस सत्ता राखणार की भाजपला संधी मिळणार याची उत्सुकता आहे. सुरुवातीचे कल हाती आले असून यानुसार राज्यात तृणमूल काँग्रेसची लाट कायम असून पुन्हा ममता बॅनर्जी विजयाची हॅटट्रिक करण्याची शक्यता आहे. तृणमूल काँग्रेस स्पष्ट बहुमत मिळवत पुन्हा एकदा सत्तेत येण्याची शक्यता आहे. तर भाजपाची मात्र १०० च्या पुढेही जाताना दमछाक होण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा