मनी लॉंड्रिंग प्रकरणातील आरोपीसोबत जॅकलिनचा आणखी एक रोमँटिक फोटो व्हायरल!

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस ही गेल्या काही दिवसांपासून २०० कोटी रुपयांच्या मनी लॉंड्रिंग प्रकरणामुळे चर्चेत आहे. या चर्चा जॅकलिनचा २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील मुख्य आरोपी सुकेश चंद्रशेखरसोबतचा फोटो व्हायरल झाल्यामुळे सुरु झाल्या. अशातच जॅकलिनचा सुकेशसोबतचा आणखी एक रोमँटिक फोटो व्हायरल झाला आहे.

वृत्तानुसार, जॅकलिन आणि सुकेशचा हा फोटो एप्रिल-जूनमधील आहे. त्याच वेळी तो जामिनावर तिहार जेलमधून बाहेर आला होता. एकंदरीत हा फोटो पाहता जॅकलिन आणि सुकेश यांच्यामध्ये चांगले नाते असल्याचे स्पष्ट होत आहे. पण जॅकलिनने त्यांच्यामध्ये कोणतेही नाते नसल्याचे सांगितले होते.

फोटोमध्ये सुकेशच्या हातात फोन दिसत आहे. या फोनमध्येच इस्रायलचे सीम कार्ड टाकून २०० कोटी वसूल केले होते. सुकेशला जामीन मंजुर झालानंतरही तो हा फोन वापरत होता. पण या फोटोमध्ये जॅकलिन असल्यामुळे चर्चा होत आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी २०० कोटी रुपयांच्या मनी लॉऩ्ड्रिंग प्रकरणात ईडीकडून जॅकलिनची जवळपास ८ तास चौकशी झाली होती. २३ ऑक्टोबर रोजी सुकेश चंद्रशेखरचे वकील यांनी खुलासा केला होता की जॅकलीन तुरुंगात असलेल्या सुकेशसोबत रिलेशनशिपमध्ये होती. पण जॅकलिनने हे खोटे असल्याचे म्हटले होते. “जॅकलिन फर्नांडिसला ईडीने साक्षीदार म्हणून बोलावले आहे. तिने तिचे जबाब नोंदवले असून, ती या पुढेदेखील तपासकार्याला पूर्णपणे सहकार्य करेल,” असे जॅकलिनच्या वकिलाने म्हटले होते.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या