‘अपयशी नेत्याला उत्तर देणं म्हणजे घाणीवर दगड फेकून अंगावर घाण उडवून घेणे आहे’

पुणे : राष्ट्रवादीच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातीयवाद वाढला, अशी टीका राज ठाकरे यांनी केली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने आणि मनसे असा वाद गेल्या काही दिवसांपासून रंगला आहे. यानंतर यावर राज ठाकरेंनी प्रबोधनकार ठाकरे यांचं लिखाण वाचण्याचा सल्ला शरद पवार यांनी दिला होता. यानंतर हा वाद आणखीनच वाढत चालला आहे.

यानंतर पवारांच्या या सल्ल्यावर राज ठाकरेंनी प्रतिक्रिया दिलीय. मी एका कार्यक्रमात तसं वक्तव्य केलं होतं. मी प्रबोधनकार ठाकरे यांची पुस्तकंही वाचली आहेत आणि यशवंतराव चव्हाण यांची पुस्तकं सुद्धा वाचली आहे. मी जे काही बोललो त्याचा आणि माझ्या आजोबांच्या पुस्तकांचा काय संबंध होता हे शरद पवार यांनी समजून सांगावे, अशा शब्दात राज ठाकरेंनी शरद पवारांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

यानंतर या सगळ्या प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते आमदार अमोल मिटकरी यांनी उडी घेतलीय. राष्ट्रवादी पक्षावर जातीयवादाचा आरोप कोण करतोय तर ज्यांनी महाराष्ट्रात दक्षिण भारतीय व उत्तर भारतीय हा द्वेष निर्माण करण्याचे महापातक करुन राष्ट्रद्रोह केला ती व्यक्ती! अपयशी नेत्याला उत्तर देणं म्हणजे घाणीवर दगड फेकून अंगावर घाण उडवून घेणे आहे, अशा शब्दांत अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा