‘अ‍ॅण्टीबॉडी कॉकेटल’ औषध आता भारतातही; एका आठवड्यात रुग्ण होऊ शकतो बरा

हैदराबाद : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोना झाल्यानंतर वापरण्यात आलेलं औषध भारतातही उपलब्ध झालं आहे. यामुळे कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी आता आणखी एका औषधाची भर पडली आहे. ‘अ‍ॅण्टीबॉडी कॉकेटल’ असं या औषधाचं नाव असून, केंद्र सरकारने याला परवानगी दिली आहे. त्यामुळे कोरोना रुग्ण एका आठवड्यात बरा होऊ शकतो.

हैदराबादमधील एआयजी रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. नागेश्वर रेड्डी यांनी ही माहिती दिली, “या औषधाच्या वापरामुळे कोरोना रुग्णांची एका आठवड्यातच आरटी-पीसीआर टेस्ट निगेटिव्ह होऊ शकतो. कोरोनाच्या डबल म्युटेशनवर ‘अ‍ॅण्टीबॉडी कॉकेटल’ किती प्रभावी आहे, याचा आम्ही एआयजीमध्ये अभ्यास करत आहोत,” असं रेड्डी म्हणाले.

“अ‍ॅण्टीबॉडी कॉकेटलच्या परिणामाबद्दलचे पुरावे अद्याप स्थापित होऊ शकलेले नसले, तरी न्यू इंग्लड जर्नल ऑफ मेडिसिनसह विविध जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या परीक्षण उत्साहवर्धक आहेत. अ‍ॅण्टीबॉडी कॉकेटलमुळे रुग्णाला रुग्णालयात भरती करण्याची वा मृत्यूची शक्यता ७० टक्क्यांनी कमी होते,” असं रेड्डी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा