InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

अंत्योदय रेल्वे रुळावरुन घसरली; कोणतीही जीवितहानी नाही

- Advertisement -

मध्य रेल्वेची कसाऱ्याच्या पुढील वाहतूक विस्कळीत झाली आहे. कसारा-इगतपूरी दरम्यान अंत्योदय एक्स्प्रेसचा डबा रुळावरुन घसरला आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. अंत्योदय एक्स्प्रेस ही गाडी घसरल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूकही विस्कळीत झाली आहे. स्टेशन काही मिनिटे दूर असताना मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने यामध्ये कोणतीही हानी झालेली नाही.

जर मोठा अपघात झाला असता तर जवळपास 100 ते 150 फूट खोल दरीत हे डबे खाली पडले असते. या बाबत रेल्वे प्रशासनाला या अपघाताबाबत माहिती विचारली असता, किरकोळ अपघात असल्याची माहिती दिली, तर पहाटे चार वाजल्यापासून प्रवासी येथे अडकले असून रेल्वे प्रशासनाने कोणतीही सुविधा पुरवली नसल्याने प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनिसकडे येणारी गोरखपूर अंत्योदय एक्स्प्रेस कसारा-इगतपूरी दरम्यान घसरल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने सांगितले. या घटनेमुळे मध्य रेल्वेची अप आणि मध्य लाईन विस्कळीत झाली आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे.

- Advertisement -

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.