अनु मलिकवर इस्त्रायलच्या राष्ट्रगीताची धुन चोरण्याचा आरोप

मुंबई : प्रसिद्ध संगीतकार आणि गायक अनु मलिक सध्या जोरदार चर्चेत आले आहेत. याचे कारण इस्त्रायलच्या राष्ट्रगीताची धुन ही ‘मेरा मुल्क मेरा देश मेरा ये चमन’ या गाण्यासारखी असल्यामुळे नेटकरी अनु मलिक यांना ट्रोल करत आहेत. तसेच त्यांच्यावर चोरीचा देखील आरोप करत आहेत.

नुकताच इस्त्रायलच्या जिमनास्ट डोल्गोपयात याने जिमनास्टमध्ये गोल्ड मेडल पटकावलं. या विजयानंतर त्याच्या देशाचं राष्ट्रगीत वाजवण्यात आलं होत. या राष्ट्रगीताची धून ही बॉलीवूडचे गाणं ‘मेरा मुल्क मेरा देश मेरा ये चमन’ यासारखी असल्यामुळे अनु मलिकवर धून चोरण्याचा आरोप होत आहे. यावर एका नेटकऱ्याने लिहलं की, “कॉपी करण्यासाठी तुला इस्त्रायलचं राष्ट्रीय गीतचं मिळालं होतं का?.”

यापुर्वी देखील अनेकदा अनु मलिक वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. अनु मलिक यांच्यावर मी टू अंतर्गत आरोप करण्यात आले होते. या आरोपानंतर अनु मलिक यांनी ‘इंडियन आयडॉल ११’ मधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा