20 लाख करोडच्या आर्थिक पॅकेजवरून अनुराग कश्यपचा मोदींना टोमणा

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी देशातील जनतेशी संवाद साधला. यावेळी मोदींनी 20 लाख करोडचं आर्थिक पॅकेज जाहीर करत देशात लॉकडाऊन वाढणार असल्याचे घोषित केले. मोदींनी या पॅकेजची घोषणा करताच, सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा जणू पाऊस पडला. दिग्दर्शक अनुराग कश्यप याने मोदींवर टीका केली आहे. “देशवासीयांसाठी जमा केलेले ते १५ लाख रुपये जोडून या पॅकेजची घोषणा केली.” असा टोला अनुरागने लगावला आहे.

निलेश राणे यांची मुख्यमंत्र्यांवर जहाल टीका

“मोदीजी जे १५ लाख रुपये देशवासीयांच्या खात्यात टाकणार होते त्या पैशांना जोडून हे पॅकेज तयार केलं आहे. खरं तर हे पैसे गेल्या सहा वर्षांपासून आजच्या दिवसासाठीच वाचवून ठेवले होते. आता हे पॅकेज आणखी वाढवले जाईल. पाहता पाहता आपण पाच अब्जांपर्यंत पोहोचू. याला म्हणतात दूरदर्शीपणा.” अशा आशयाचं ट्विट अनुरागने केलं आहे. त्याचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

Loading...

दारूविक्री करताना होम डिलिव्हरीचा राज्य सरकारने विचार करा-सर्वोच्च न्यायालय

यानंतर त्याने पुन्हा एकद ट्विट केले. यातही त्याने मोदींवर उपहासात्मक टीका केली. ‘पण एक गोष्ट अगदी बरोबर बोललात प्रभु…. स्वावलंबी बना.. अन्यथा काहीही होणार नाही. प्रभुवर विसंबून राहिलात तर काहीही खरे नाही,’असे आपल्या या दुस-या ट्विटमध्ये त्याने लिहिले.

 

 

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.