Anurag Kashyap vs Vivek Agnihotri | अनुराग कश्यप आणि विवेक अग्निहोत्री यांनी एकमेकांवर केली टीका

Anurag Kashyap vs Vivek Agnihotri | टीम महाराष्ट्र देशा: दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) आणि अनुराग कश्यप (Anurag Kashyap) यांच्यामध्ये ट्विटर (Twitter) वर वॉर सुरू आहे. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द-कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाचा वाद अद्यापही संपला नाहीये. यावर्षी सर्वात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये या चित्रपटाचे नाव घेतल्या जातात. ‘द-काश्मीर फाइल्स’ या चित्रपटासाठी केलेल्या रिसर्चबद्दल विवेक अग्निहोत्री आणि अनुराग कश्यप यांच्यामध्ये वाद निर्माण झाला आहे. या दोघांनी ट्विटरच्या माध्यमातून आपापली मतं मांडली आहे.

एका मुलाखतीमध्ये अनुराग कश्यपने ‘कांतारा’ आणि ‘पुष्पा’ यासारख्या चित्रपटाबाबत भाष्य केलं होतं. या विधानानंतर अनुराग कश्यप अनेक दिवस चर्चेत होते. त्यांच्या म्हणण्यानुसार, ‘पुष्पा’, ‘कांतरा’ यांसारखे चित्रपट मनोरंजनसृष्टीचे नुकसान करत आहे. हे चित्रपट हिट झाल्यानंतर संपूर्ण चित्रपटसृष्टी अशाच प्रकारचे चित्रपट बनवण्यावर भर देत आहे आणि ते अत्यंत धोकादायक आहे. असे स्पष्टीकरण अनुराग कश्यपने दिले होते.

अनुराग कश्यपच्या या वक्तव्यावर विवेक अग्निहोत्रीने आपले मत मांडले आहे. विवेक अग्निहोत्रीने अनुरागच्या या विधानाचा फोटो शेअर करत ट्विटरवर एक पोस्ट लिहिली. यामध्ये तो म्हणाला आहे की,”मी अनुरागच्या या मताशी सहमत नाही.” तर, दुसरीकडे अनुरागने विवेकच्या ‘द-कश्मीर फाईल्स’ चित्रपटाबद्दल टिप्पणी दिली आहे. तो ट्विट करत म्हणाला आहे की,”सर तुमची चूक नाहीये, या छोट्या ट्विट प्रमाणेच तुमच्या चित्रपटाचा रिचार्ज देखील छोटाच होता. तुम्हाला फॉलो करणाऱ्या मीडियाची सुद्धा हीच परिस्थिती आहे. सध्या आम्ही हे खपवून घेतला आहे. पण यानंतर अशा विषयांवर गांभीर्याने अभ्यास करा.” या ट्वीटच्या माध्यमातून अनुराग ने ‘द-कश्मीर फाइल्स’ चित्रपटासाठी केलेल्या रिसर्चवर टीका केली आहे.

अनुरागच्या या ट्विटवर विवेक अग्निहोत्रीने खोचक उत्तर दिलं आहे. ट्विट करत विवेक म्हणाला आहे की,”द-काश्मीर फाइल्स या चित्रपटासाठी केलेला 4 वर्षाचा रिसर्च खोटा आहे, हे सिद्ध करून दाखवा. आमच्याकडे असलेले 700 पंडितांची व्हिडिओ खोटे आहे. हिंदूचा नरसंहार झालाच नाही. हे सगळं जर तुम्ही सिद्ध करून दाखवलं तर आमच्याकडून अशी चूक पुन्हा होणार नाही.” अशाप्रकारे हे दोन्ही दिग्दर्शक ट्विटरवर वॉर करत आहे.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed.