Anushka Sharma | कोलकत्याच्या काली घाट मंदिराजवळ मुलगी वामिका सोबत दिसली अनुष्का शर्मा

कोलकाता: बॉलीवूड सुपरस्टार अनुष्का शर्मा Anushka Sharma तिच्या सोशल मीडिया Social Media व्दारे चाहत्यांना तिच्या अपडेट्स देत असते. परंतु गेल्या अनेक वर्षापासून अनुष्का शर्मा कुठल्याही चित्रपटांमध्ये दिसली नाही. दरम्यान, ती सध्या तिच्या ‘चकडा एक्सप्रेस’ Chakda Express या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून अनुष्का तब्बल चार वर्षानंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. पुढच्या वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. चकडा एक्सप्रेस या चित्रपटांमध्ये अनुष्का शर्मा भारतीय महिला क्रिकेट खेळाडू झुलन गोस्वामी यांची भूमिका साकारणार आहे. त्यामुळे झुलन गोस्वामीचे मूळ गाव असलेल्या कोलकत्ता शहरांमध्ये या चित्रपटाचे अर्ध्यापेक्षा जास्त शूटिंग पार पडले आहे. चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान अनुष्का शर्मा कोलकत्यामध्ये अनेक ठिकाणी दिसली आहे. चित्रपटाच्या व्यस्त शूटिंग मधून अनुष्का आपली मुलगी वामिकासह कालीघाट मंदिराला भेट दिली आहे. एवढेच नाही तर अनुष्काने कोलकत्ता शहरातील स्वादिष्ट मेजवानीचाही आनंद घेतल्याचे या पोस्ट मधून कळत आहे.

मुलगी वामिकासह कोलकत्यात काली घाट मंदिराजवळ दिसली अनुष्का शर्मा Anushka Sharma

भारतीय महिला क्रिकेटर झुलन गोस्वामी यांच्या जीवनावर आधारित चकडा एक्सप्रेस या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान अनुष्का शर्मा कोलकत्ता मध्ये कालीघाट मंदिराजवळ दिसली आहे. या चित्रपटाचे निम्मेहून अधिक शूटिंग पश्चिम बंगालच्या अनेक भागांमध्ये झाले आहे. दरम्यान, अभिनेत्री कोलकत्तामध्ये धमाल करताना दिसले आहे. अनुष्काने नुकताच तिचा सोशल मीडिया अकाउंट वर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अनुष्का कोलकत्यातील कालीघाट मंदिर जवळ दिसली असून तिने कोलकत्ता मधील खाद्य पदार्थांचा देखील भरपूर आनंद घेतल्याचे दिसत आहे. या फोटोला अनुष्का कॅप्शन देत म्हणाली आहे की, “खा, प्रार्थना करा, आणि प्रेम करा.. माझे कोलकत्ता मधील फोटो.

या आधी अनुष्काने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, कोलकत्ता हे तिचे आवडते शहर असून तिच्या हृदयात कोलकत्यासाठी विशेष स्थान आहे. कोलकत्ता मधील लोक उभारता खाद्यपदार्थ वस्तू कला इत्यादी गोष्टी मला फार आवडतात.

महत्वाच्या बातम्या 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.