Anushka Sharma | भारताने पाकिस्तानवर मात केल्यानंतर अनुष्का शर्माची विराटसाठी खास पोस्ट, म्हणाली…

Anushka Sharma | मुंबई : टी-२० विश्वचषकात भारतीय संघाने शेवटच्या चेंडूवर दणदणीत विजय मिळवला आहे. विराट कोहली याने एकट्याने संघाला विजयापर्यंत नेले. त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. कोहलीने या खेळीला आपली सर्वोत्तम खेळी म्हटले आहे. अशातच प्रसिद्ध अभिनेत्री आणि विराट कोहली (Virat Kohli) याची पत्नी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) हिने विराटसाठी अतिश खास अशी पोस्ट शेअर केली आहे.

विराटच्या रुपाचं कौतुक करत तु आज रात्री लोकांच्या जीवनात खूप आनंद आणला आहे आणि तोही दिवाळीच्या पूर्वसंध्येला, असं अनुष्काने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. तसेच, तू एक अद्भुत माणूस आहेस आणि मला प्रिय आहेस, तुझी जिद्द आणि विश्वास मनाला चटका लावणारा आहे, असं देखील अनुष्काने म्हटलं आहे.

मी नुकताच माझ्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट सामना पाहिला आहे आणि मी म्हणू शकते की, आमची मुलगी हे समजण्यासाठी खूप छोटी आहे की तिची आई आजूबाजूला का नाचत होती आणि खोलीत ओरडत होती, तरी एक दिवस तिला समजेल की तिच्या वडिलांनी त्या रात्री आपली सर्वोत्तम खेळी खेळली होती, त्याच्यासाठी कठीण असलेल्या टप्प्याचे अनुसरण केलं, मात्र, तो पूर्वीपेक्षा अधिक मजबूत आणि हुशार झाला, अशा भावूक शब्दांमध्ये अनुष्काने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, खूप अभिमान आहे तुझा, तुझी शक्ती संक्रामक आहे आणि तू माझ्या प्रिये, अमर्याद आहेस, असं म्हणत अ नुष्काने तिचं प्रेम व्यक्त केलं आहे. तसेच अनुष्काने शेअर केलेल्या पोस्टमध्ये टिव्हीवर सामना सुरु आहे. मात्र, त्याखालीच तिच्या मुलीचं प्रतिबिंब दिसत असल्याने तिने मुलीच्या चेहऱ्यावर इमोजी लावला आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.