72 तासात माफी मागा अन्यथा, 100 कोटींचा दावा ठोकणार; अनिल परबांचा सोमय्यांना गंभीर इशारा

मुंबई : भाजपचे फायर ब्रँड नेते किरीट सोमय्या यांनी सत्ताधारी पक्ष महाविकास आघाडीतील नेत्यांवरील भ्रष्ट्राचाराचे आरोप करत पुरावे मिळवण्यासाठी धाडसत्र सुरु केलंय. यावेळी त्यांनी आता पुन्हा एकदा ठाकरे सरकारला अडचणीत आणणारा दावा केला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख, परिवहन मंत्री अनिल परब यांच्यानंतर आता सोमय्यांनी राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्ट्राचाराचे आरोप लावलेत.

याआधी अनिल परब यांच्यावर किरीट सोमय्यांनी गंभीर आरोप केले होते. त्या आरोपाला आता परब यांनी कायदेशीररित्या उत्तर देण्याची तयारी दाखवली आहे. सोमय्या यांनी माझ्यावर जे काही आरोप केले आहेत. त्या आरोपांचं पुराव्यासह स्पष्टीकरण द्यावं, अन्यथा 72 तासात माफी मागावी, नाहीतर किरीट सोमय्या यांच्यावर 100 कोटी रूपयांचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार, अशी नोटीस अनिल परब यांच्या वकिलांनी किरीट सोमय्या यांना पाठवली आहे.

किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्यावर दापोली येथे दोन अनधिकृत रिसॉर्ट बांधल्याचा आरोप केला होता. तसंच, परिवहन खात्यात भ्रष्टाचार केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. अनिल परब यांना वसुली मंत्री म्हटलं होतं. यावरुन आता अनिल परब यांनी किरीट सोमय्या यांना नोटीस बजावली आहे. सोमय्या वैयक्तिक द्वेषभावनेतून असे आरोप करत असल्याचं अनिल परब यांनी नोटीसीद्वारे म्हटलं आहे. या नोटीसीमध्ये किरीट सोमय्या यांनी केलेल्या वक्तव्यांचा आणि ट्विट्सचा संदर्भ देण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या

 

 

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा