InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

अ‍ॅपलच्या आयफोन्सची निर्मिती भारतात

अ‍ॅपल आयफोनचे भारतात असंख्य चाहते आहेत. बाजारात अ‍ॅपलचे फोन लाँच केले की ते आपल्याकडे असावे अशी अनेकांची इच्छा असते. मात्र, ते अगोदर अमेरिका किंवा युरोपियन बाजारपेठेत दाखल झाल्यानंतर भारतात येतात. मात्र, यापुढे ते भारतामार्गे संपूर्ण जगभर प्रवास करतील.

हायएंड आयफोन बनविणारी फॉक्सकॉन ही तैवानची कंपनी अ‍ॅपलच्या आयफोनचे असेम्बलिंग करते. फॉक्सकॉनने भारतात मोठ्या प्रमाणात आपले युनिट सुरु केले आहे. फॉक्सकॉन अ‍ॅपलच्या हायएंड आयफोनचे भारतात असेम्बलिंग करणार आहे. यासाठी कंपनीने त्यांच्या तमिळनाडूतील पेराम्बदूर प्रकल्पाची निवड केली आहे.

महत्वाच्या बातम्या –

Sponsored Ads

Get real time updates directly on you device, subscribe now.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.