Apple New Launch | ॲपल करणार ‘हे’ नवीन प्रोडक्ट लॉन्च! कधी आणि कोणते? जाणून घ्या

Apple New Launch | टीम महाराष्ट्र देशा: दिग्गज टेक कंपनी ॲपल (Apple) ची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. याच पार्श्वभूमीवर कंपनी आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन प्रॉडक्ट्स लॉन्च करत असते. ॲपलचा सर्वात मोठा कार्यक्रम म्हणजेच वर्ल्ड वाईल्ड डेव्हलपर्स कॉन्फरन्स (WWDC) 05 जून पासून सुरू झाला आहे. या कार्यक्रमामध्ये कंपनी आपले नवीन प्रोडक्स लॉन्च करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

वर्ल्ड वाइल्ड डेव्हलपर्स कॉन्फरन्स (World Wild Developers Conference) मध्ये ॲपल कंपनी आपले नवीन मॉडेल्स लॉन्च (Apple New Launch) करू शकते. यामध्ये 15inch MacBook Air, iOS 17, macOS 14 आणि watchOS 10 यांचा समावेश असू शकतो. thequint ने याबाबत माहिती दिली आहे.

You can watch this Apple event on Apple TV and YouTube

ॲपलचा (Apple New Launch) हा इव्हेंट तुम्ही भारतामध्ये रात्री 10.30 वाजेपासून बघू शकतात. तुम्ही हा कार्यक्रम ॲपल टीव्ही आणि युट्युबवर बघू शकतात. हा कार्यक्रम 05 जून ते 09 जून दरम्यान पार पडणार आहे.

हा कार्यक्रम बघण्यासाठी तुम्ही http://www.apple.com या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात. वेबसाइट ओपेन झाल्यानंतर तुम्हाला WWDC 2023 इव्हेंटला (Apple New Launch) भेट द्यावी लागेल. पेज ओपेन झाल्यावर तुम्हाला हा कार्यक्रम बघता येईल.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/42nntyg