ज्येष्ठ नेते, पुरोगामी विचारवंत प्रा. एन डी पाटील यांचं निधन

कोल्हापूर : महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक मोठी घटना घडली आहे. शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते प्राध्यपक एन.डी. पाटील यांचं निधन झालं आहे. कोल्हापुरात उपचारादरम्यान वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानं राज्याच्या सामाजिक आणि राजकीय जीवनातील लढाऊ नेतृत्त्व हरपलं आहे. प्रकृती बिघडल्यानं कोल्हापूरमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
वातावरणात बदल झाल्याने त्यांना थोडी अस्वस्थता वाटत होती, त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथं उपचारादरम्यान त्यांना दोन ब्रेन स्ट्रोक येऊन गेले. त्यामुळे त्यांचे बोलणेही बंद झाले होते. मागच्या दोन चार दिवसांपासून त्यांच्या पोटात अन्नपाणी देखील गेलेले नव्हते. ते उपचारासही फारसा प्रतिसाद देत नव्हते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणून डॉक्टरांचे प्रयत्न सुरू होते. मात्र, त्याला यश आलं नाही.
करोनाच्या दुसऱ्या लाटेत त्यांना करोनाचा संसर्ग देखील झाला होता. परंतु या वयात देखील त्यांनी करोनावर यशस्वीपणे मात केली होती. एक झुंजार नेतृत्व अशी त्यांची ओळख होती. कामगार, शेतकरी यांच्या अनेक प्रश्नांसाठी ते कायम लढत राहिले. एन.डी. पाटील यांच्या निधनामुळं राज्याच्या सामाजिक,राजकीय जीवनातील लढाऊ नेतृत्व हरपलं असून कोल्हापूरसह राज्यावर शोककळा पसरली आहे.
महत्वाच्या बातम्या
- कुठे गेले बाळासाहेब ठाकरेंचे विचार, त्यांचे आदर्श? नवनीत राणांचा मुख्यमंत्र्यांना संतप्त सवाल
- सुप्रसिद्ध कथ्थक नर्तक पं. बिरजू महाराज यांचे निधन, हृदयविकाराच्या धक्क्याने अखेरचा श्वास
- ही शिवसेना नव्हे, ही तर काँग्रेस सेना; शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्यावरुन रवी राणा आक्रमक
- अमरावतीत शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला, नवनीत राणा, रवी राणांच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त
- … म्हणून विराटने स्वत:हून राजीनामा दिला, सुनील गावस्करांनी केला खुलासा