मलायकासोबतच्या घटस्फोटावर चार वर्षांनंतर अरबाज खानने दिली पहिल्यांदाच प्रतिक्रिया

मुंबई : बॉलिवूडमधील जोडी मलायका अरोरा आणि अरबाज खान यांनी २०१७ साली घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर कोणतीही प्रतिक्रिया देणं टाळणाऱ्या अरबाजने आता मात्र या सर्वच गोष्टींवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आपल्या घटस्फोटाबद्दल बोलताना अरबाज म्हणाला, ”कदाचित चाहते आणि फॉलोअर्स यांना जे कपल्स आवडतात त्यांना एकत्र पाहण्याची इच्छा असते. अलिकडेच अभिनेता आमिर खानसोबतही हे झालं आहे. याचा अर्थ असा नाही की आम्ही चुकीचे आहोत. माझा आणि मलायकाचा जेव्हा घटस्फोट झाला तेव्हा आम्हाला सोशल मीडियावर खूप ट्रोल करण्यात आलं होतं. त्यावेळी मी या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केलं आणि पुढे गेलो. पूर्वी सोशल मीडियावरील नकारात्मक कमेंटमुळे मला त्रास होत असे पण आता तसं अजिबात होत नाही. मी त्यांच्याकडे लक्षाच देत नाही.” असं अरबाज म्हंटला.

अरबाज खान आणि मलायका अरोरा यांनी १९९८ साली लग्न केलं होतं. अखेर २०१७ मध्ये घटस्फोट घेत दोघंही वेगळे झाले. लग्नाच्या जवळपास १ वर्ष आधी दोघंही वेगवेगळे राहत होते. त्यानंतर दोघांनीही वेगळं होण्याचा निर्णय घेतला. मलायका अरोरा सध्या अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. ज्याची माहिती तिनं सोशल मीडियावरून दिली होती. तर दुसरीकडे अरबाज खान मॉडेल जॉर्जिया अँड्रियानी हिला डेट करत असल्याचं बोललं जातं.

महत्वाच्या बातम्या 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा