आंदोलक शेतकरी देशद्रोही मग अर्णब गोस्वामी, आणि कंगणा राणावत देशप्रेमी आहेत का ?

दिल्ली : तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. केंद्र सरकारच्या ३ कृषी कायद्याविरोधात शेतकरी २ महिन्यांपेक्षा अधिक काळ लोटला तरी दिल्लीत आंदोलन करत आहेत. प्रजासत्ताक दिनाला या आंदोलनाला हिंसक वळण आलेले देखील सगळ्यांनी पाहिले. पण त्यानंतरही शेतकरी बांधव शांतपणे पुन्हा एकदा आंदोलन करत आहेत.

यावरच आता राज्यसभा सभागृहात बोलताना शिवसेना नेते संजय राऊतांनी कृषी कायदे, अर्णब गोस्वामी आणि कंगणा राणावत यांच्यावर भाष्य केलं. आपल्या हक्कासाठी लढणाऱ्या शेतकऱ्यांना देशद्रोही म्हटलं जातं मग भारतप्रेमी कोण आहेत?, असा सवाल करत शिवसेना संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

अर्णब गोस्वामी, आणि कंगणा राणावत देशप्रेमी आहेत का?, त्यांनी राष्ट्रीय सुरक्षेच्या गोष्टी जाहीर केल्या आहेत, अशा गोष्टींना बळ देणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

शेतकरी आंदोलन हे फक्त तीन राज्यांचं नाही तर सगळ्या देशातील शेतकऱ्यांचं आहे. पंजाबचे शेतकरी कोरोनाकाळात लंगर चालवतात आणि मुघलांविरोधात लढतात तेव्हा ते देशप्रेमी मग आंदोलन केलं तर ते देशद्रोही कसे झाले?, असं राऊत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा