राज्यकर्ते असे भीक मागणारे असतात का?; अजित पवार यांची तावडेंवर खरमरीत टीका

शिवस्वराज्य य़ात्रेच्या दुसऱ्या टप्प्यातील दारव्हा दिग्रज येथील सभेत विधिमंडळ पक्षनेते आ. अजित पवार यांनी फडणवीस सरकारच्या नियोजनशून्य कारभारावर ताशेरे ओढले. राज्य सरकार अत्यंत निष्क्रिय आहे. महापूर ओसरला तरी सरकारला अजून जनतेला सावरता आले नाही. शिक्षण मंत्री विनोद तावडे भीक मागून मदत गोळा करत होते. राज्यकर्ते असे भीक मागणारे असतात का? अशी खरमरीत टीका पवार यांनी यावेळी केली.

महाराष्ट्रात अंमली पदार्थाचे सेवन प्रचंड वाढले आहे. उडता पंजाब या चित्रपटात पंजाबची भीषण परिस्थिती मांडली गेली. महाराष्ट्राची अवस्थाही अशीच बिकट होताना दिसत आहे. भाजपा सरकारने महाराष्ट्राचा उडता महाराष्ट्र करून ठेवला आहे, असा आरोप अजित पवार यांनी केला.तावडे

महत्वाच्या बातम्या –

Loading...
महत्वाच्या बातम्या
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.