InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

‘देशातील तपास यंत्रणा मोदी-शहा जोडगोळीचे कार्यकर्ते आहेत का?’

- Advertisement -

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अंमलबजावणी संचलनालयाकडून नोटीस आल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटेनेचे अध्यक्ष राजू शेट्टी भडकले आहेत. देशातील तपास यंत्रणा मोदी-शहा जोडगोळीचे कार्यकर्ते आहेत का? असा सवाल करत त्यांनी हल्लाबोल केला

व्यवहार २० ते २२ वर्षापूर्वीचा असल्याने आतापर्यंत ईडी झोपा काढत होती का? अशी विचारणा त्यांनी केली. सरकारविरोधात रान उठवल्यास तपास यंत्रणा मागे लावल्या जातात  असा हल्ला राजू शेट्टी यांनी चढवला. राज यांनी ईव्हीएम विरोधी भूमिका घेतल्यानेच ईडीचा ससेमीरा लावल्याचा घणाघात  शेट्टी यांनी केला.

- Advertisement -

या लढ्याध्ये आम्ही राज ठाकरेंच्या पाठिशी आहोत, असे राजू शेट्टी यांनी नमूद केले. शेट्टी यांनी ईव्हीएम बाजूला करून निवडणूका जिंकून दाखवा असे आव्हान त्यांनी सरकारला दिले. मतदार तुम्हाला  जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा त्यांनी दिला.

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.