Arjun Kapoor | अर्जुन कपूरच्या ‘कुत्ते’ चित्रपटाची नवीन रिलीज डेट जाहीर

मुंबई: बॉलीवूड (Bollywood) अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) सध्या त्याच्या ‘कुत्ते’ (Kuttey) चित्रपटामुळे चर्चेत आहे. अर्जुन कपूरच्या या आगामी चित्रपटाचे दिग्दर्शन चित्रपट निर्माते विशाल भारद्वाज यांचा मुलगा आकाश भारद्वाज यांनी केले आहे. तर, या चित्रपटांमध्ये अर्जुन कपूर मुख्य भूमिकेत दिसणार असून हा चित्रपट सस्पेन्स आणि थ्रिलने भरलेला असणार आहे. या आधी हा चित्रपट 4 नोव्हेंबर रोजी चित्रपट गृहामध्ये प्रदर्शित होणार होता, पण नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार, निर्मात्यांकडून चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आलेली आहे.

अर्जुन कपूर (Arjun Kapoor) च्या ‘कुत्ते’ चित्रपटाची नवीन रिलीज डेट

लव रंजन, विशाल भारद्वाज, अंकुर गर्ग आणि रेखा भारद्वाज निर्मित चित्रपट ‘कुत्ते’ दिनांक 13 जानेवारी 2023 मध्ये म्हणजेच पुढच्या वर्षी चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्याचबरोबर चित्रपट निर्माते विशाल भारद्वाज यांचा मुलगा आकाश भारद्वाज याने या चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रामध्ये पदार्पण केले आहे. तर हा चित्रपट भूषण कुमार यांच्या टी-सिरीज ने सादर केला आहे. लव फिल्मच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंट वरून या चित्रपटाची नवीन रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे.

चित्रपटातील इतर कलाकार

आकाश भारद्वाज दिग्दर्शित ‘कुत्ते’ चित्रपटांमध्ये बॉलीवूड अभिनेता अर्जुन कपूर मुख्य भूमिकेमध्ये दिसणार आहे. त्याचबरोबर या चित्रपटांमध्ये कोंकणा सेन शर्मा, नसरुद्दीन शहा, तब्बू आणि राधिका मदन देखील मुख्य भूमिकेमध्ये दिसणार आहे.

ओंकारा, कमिने आणि मकबुल सारख्या सुपरहिट चित्रपटाचे दिग्दर्शन करणाऱ्या विशाल भारद्वाज यांचा मुलगा आकाश भारद्वाज ‘कुत्ते’ चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रामध्ये पदार्पण करत आहे. आकाश भारद्वाजने न्यूयॉर्कमधील स्कूल ऑफ व्हिजन आर्ट्स मधून फिल्म मेकिंगची पदवी प्राप्त केली आहे. त्याचबरोबर त्याने वडील विशाल भारद्वाज यांच्यासोबत ‘सात खून माफ’ ‘मटरू बिजली का मंडोला’ यासारख्या चित्रपटांमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे.

महत्वाच्या बातम्या 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.