‘अरमान मला आई- बहिणीवरून शिवीगाळ करत होता…’; काम्या पंजाबीचं ट्वीट चर्चेत

मुंबई : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो जो वादासाठी ओळखला जातो तो म्हणजे ‘बिग बॉस’. काही दिवसांपूर्वीचं शोचा नवीन सिझन ‘बिग बॉस १५’ सुरु झाल्यापासून या शो चर्चेचा विषय ठरत आहे. नुकत्याच एका भागात प्रतीक सहजपाल आणि जय भानुशालीमध्ये वाद रंगलेला पाहिला मिळाला.

जय भानुशालीच्या या वागण्यावर शोमधील स्पर्धकांसोबतच अनेक प्रेक्षकांनी देखील नाराजी व्यक्त केलीय. तसचं इतर कलाकारांनी देखील प्रतिक्रिया दिल्या आहेत. यावर माजी बिग बॉस स्पर्धक आणि अभिनेत्री काम्या पंजाबीने देखील तिचं मत व्यक्त केलंय.

खरं तर काही दिवसांपूर्वी काम्या पंजाबीने क्रिकेटमध्ये झालेल्या शिवीगाळ प्रकरणावर एक ट्वीट केलं होतं. यावर “क्रिकेटची तुलना बिग बॉससोबत करू नका” असं हा युजर म्हणाला होता. यावर आता काम्या पंजाबीने उत्तर दिलंय. तसंच बिग बॉसच्या घरात शिवीगाळ करण्यावर ती म्हणाली, “अरमान फक्त घटस्फोटीत म्हणाला नव्हता तर त्याने मला आई- बहिणीवरून शिवीगाळ देखील केली होती.” असं काम्या म्हणाली.

पुढे ती म्हणाली, “मी त्याच्यासमोर हसत होते आणि एकटी असताना ऱडत होते. मी कोणत्याही प्रकारचा विरोध केला नाही आणि बिग बॉसची प्रॉपर्टी देखील तोडली नाही. नाही तर आम्हा दोघांमध्ये काय फरक राहिला असता आणि शिवी ही शिवीच असते मग ती क्रिकेटमध्ये दिलेली असो किंवा बिग बॉस” असं काम्या या ट्वीटमध्ये म्हणालीय.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा