Army Public School | आर्मी पब्लिक स्कूलमध्ये नोकरीची संधी! ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

Army Public School | टीम महाराष्ट्र देशा: आर्मी पब्लिक स्कूल, अहमदनगर यांच्यामार्फत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया (Recruitment process) राबवण्यात आली आहे. त्यांच्यामार्फत या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार विहित नमुन्यात अर्ज करू शकतात.

आर्मी पब्लिक स्कूल (Army Public School) यांच्या आस्थापनेवरील मुख्याध्यापिका आणि विशेष शिक्षक पदाची प्रत्येकी एक रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेतील (Army Public School) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

पात्र आणि इच्छुक उमेदवारांना या भरती प्रक्रियेमध्ये (Army Public School) दिनांक 25 मे 2023 पर्यंत पोहोचेल अशा बेताने अर्ज पाठवणे अनिवार्य आहे. उमेदवारांना खालील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)

मुख्याध्यापक, आर्मी पब्लिक स्कूल अहमदनगर, C/O AC सेंटर आणि स्कूल, अहमदनगर – 414002

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://www.apsahmednagar.com/Home/Index#

महत्वाच्या बातम्या