InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

जवानांना वेळेवर शस्त्र मिळत नाहीत, लष्कराचा खळबळजनक रिपोर्ट!

देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या भारतीय लष्कराने त्यांना मिळणाऱ्या शस्त्रांची गुणवत्ता आणि ते मिळण्यास लागणाऱ्या विलंबाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. ऑर्डिनस फॅक्ट्री बोर्डकडून मिळणारे 21 हजार 500 कोटी रुपयांचे शस्त्रे आणि काडतुसे गेल्या 10 वर्षात सातत्याने उशिरा मिळत आहेत. यासंदर्भात संरक्षण मंत्रालयाला 15 पानांचा एक रिपोर्ट देखील सादर केला आहे.

टाइम्स ऑफ इंडिया वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय लष्कर आणि OFB या दोन्ही विभागांनी शस्त्र पुरवठा वेळेवर होत नसल्याची तक्रार संरक्षण मंत्रालयाकडे केली आहे. शस्त्रे खरेदी करण्याची पहिली योजना 2009-14 मध्ये पूर्ण होणार होती. 14 हजार कोटी रुपयांचे शस्र पुरवठा वेळेवर मिळाला नव्हता. त्यानंतरची दुसरी योजना 2014-19 या काळातील होती. या काळात 7 हजार 500 कोटी रुपयांचा शस्त्र पुरवठा होणार होता. पण अद्याप त्याबद्दल काहीच प्रक्रिया पूर्ण झाली नाही.

महत्त्वाच्या बातम्या –

Sponsored Ads

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.