InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तातडीने मिळण्याची व्यवस्था करा – पंजाब हायकोर्ट

- Advertisement -

देशातला शेतकरी मरणावस्थेला पोहोचला आहे, तरी राजकारण्यांना त्याची फिकीर नाही. परंतु शेतकऱ्याला न्याय देणारा एक आवाज नुकताच पंजाबमध्ये घुमला आहे. ज्या एमएसपीच्या मुद्द्यावरुन सतत आश्वासनांची खैरात सुरु असते, त्यांना पंजाब हायकोर्टाने चांगलंच ठणकावलं आहे. शेतमालाचा योग्य मोबदला देण्यासाठी एमएसपीची किमान आधारभूत किंमत हमीभाव  किंमत उत्पादन खर्चाच्या तिप्पट असली पाहिजे, असा महत्त्वपूर्ण आदेश नुकताच पंजाब हायकोर्टाने दिला.

एमएसपी अर्थात किमान आधारभूत किंमत मिळाली नाही तर किमान या दराची हमी तरी सरकारकडून शेतकऱ्याला मिळते. स्वामीनाथन आयोगाने उत्पादन खर्चाच्या किमान दीडपट हमीभाव द्यायला पाहिजे, अशी शिफारस सरकारला केली होती. आता या शिफारशींनाही जवळपास 15 वर्षे झाली आहेत.

- Advertisement -

त्यामुळे आता पंजाब हायकोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचं धाडस कुठलं सरकार करणार हा प्रश्न आहे.तिप्पट एमएसपी द्या, एवढंच सांगून पंजाब हायकोर्ट थांबलं नाही. तर त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारला एमएसपीबाबत पद्धतीशर कायदा आणून शेतकऱ्यांच्या हक्कांचं रक्षण करायला सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.