संभाजी भिडेंविरोधात अटक वॉरंट जारी; आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा

शिवप्रतिष्ठान या संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या विरोधात बेळगावमध्ये अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. संभाजी भिडे यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल केला गेला आहे.

अमेरिकेने एकादशीला यान सोडले म्हणून यशस्वी झाले – संभाजी भिडे

गेल्यावर्षी 13 एप्रिल 2018 या दिवशी बेळगाव जवळील येळ्ळूर या गावात महाराष्ट्र मैदानावर कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी संभाजी भिडे हे प्रमुख पाहुणे होते. आचारसंहिता लागू असतानाही भिडे यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांना निवडून द्यावं असं आपल्या भाषणातून विधान केलं होतं. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी संभाजी भिडे यांच्या गुन्हा दाखल केला होता

मुख्यमंत्र्यांच्या भाच्याला ईडीकडून अटक, 354 कोटींच्या बँक घोटाळ्याचे आरोप

मात्र आत्तापर्यंतच्या सगळ्या सुनावणीवेळी संभाजी भिडे गैरहजर राहिल्याने त्यांच्याविरोधात अटक वारंट जारी करण्यात आले आहे, दरम्यान या संदर्भातली पुढची सुनावणी येत्या 24 मार्चला होणार आहे. त्यामुळे वादग्रस्त वाकव्यामुळे संभाजी भिडे पुन्हा  एकदा अडचणीत सापडले आहेत.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.