आर्यन खानला फक्त हिंदू-मुस्लीम वादासाठीच अटक केली; नाना पटोलेंच मोठं वक्तव्य

मुंबई : कॉर्टेलिया क्रुझवर एनसीबीनं छापा टाकून अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याच्यासह 8 जणांना अटक केली. यानंतर गेल्या काही दिवसांपासून आर्यन खान प्रकरण देशाच्या आणि राज्याच्या राजकारणाच्या केंद्र स्थानीं आहे. यानंतर राजकीय आणि बॉलिवूड मधून आर्यन खानच्या समर्थनार्थ आणि विरोधात दोन्ही बाजूंनी अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

यानंतर २० ऑक्टोबरला आर्यन खानच्या जामिन अर्जावर सुनावणी झाली. यानंतर पुन्हा एकदा आर्यन खानचा जमीन अर्ज फेटाळण्यात आला होता. गेल्या २० दिवसापासून आर्यन तुरूंगात आहे. त्याच्या जामिनासाठी वकिल अर्ज करत आहे. मात्र, आर्यनचा जामीन पुन्हा फेटाळल्याने आता आर्यनच्या अडचणी वाढल्याचं दिसतंय. यावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एनसीबीवर गंभीर आरोप केला आहे.

आर्यन खानला फक्त हिंदू आणि मुस्लीम वादासाठीच अटक करण्यात आली आहे. देशात हिंदू – मुस्लीम ध्रुवीकरणाचा कट शिजत असल्याचा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केला आहे. त्यामुळे त्यांचा रोख भाजपवर असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात होताना दिसत आहे. कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही, ते चुकीचे करतील त्यावर कारवाई झाली पाहिजे, असंही पटोले म्हणाले.

तसेच अदानी मुंद्रा बंदरावर 3 हजार किलो अंमली पदार्थ सापडले त्याचे काय झाले. त्याच्यावर काहीच कारवाई केली जात नाही. आपल्या उद्योगपती मित्रांना वाचवण्यासाठी व अदानी मुंद्रा बंदरावर सापडलेल्या अंमलपदार्थाच्या मोठ्या साठ्यावरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी मुंबईत कारवाया केल्याचे दाखवले जात आहे. मुंबईतील एनसीबीच्या कारवाया म्हणजे ‘दाल मे कुछ काला है…’ असे वाटते. शाहरुख खानच्या मुलाला एनसीबीने अटक केली त्याला हिंदू-मुस्लीम रंग देण्याचा अत्यंत हिन प्रयत्न भाजपाकडून होत असल्याचा आरोप पटोले यांनी केलाय.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा