InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

कलम ३७० : संयुक्त राष्ट्रामध्ये जाण्याच्या पाकच्या निर्णयाला चीनचा पाठिंबा – कुरेशी

- Advertisement -

जम्मू काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे कलम ३७० भारताने रद्द केल्यानंतर पाकिस्तनाचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी चीनचा दौरा केला. यावेळी त्यांनी चीनचे परराष्ट्रमंत्री वाँग यी यांनी भेट घेऊन भारताच्या निर्णयावर चर्चा केली. तसेच काश्मीर प्रश्नी चीनेन चिंता व्यक्त केली.

काश्मीर मुद्दा दोन्ही देशांनी संयुक्त राष्ट्राच्या नियमावलीनुसार शांततेने सोडवावा, असे आवाहन परराष्ट्रमंत्री वाँग यी यांनी केले. भारत पाकिस्तानमध्ये जम्मू काश्मीरवरून जुना वाद असून दोन्ही देशांनी संयम दाखवावा. तणाव वाढेल अशी कोणतीही कृती दोन्ही देशांनी करु नये, असे चीनचे म्हटले आहे. काश्मीर मुद्दा संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत नेण्याच्या पाकिस्तानच्या निर्णयाला चीनने पाठिंबा दर्शवला आहे, असे कुरेशी यांनी म्हटले आहे.

Loading...

- Advertisement -

मात्र, काश्मीर मुद्दा भारताचा अंतर्गत प्रश्न असून पाकिस्तानचा त्याच्याशी काहीही संबध नसल्याचे भारताने स्पष्ट केले आहे. काश्मीरबाबत भारताच्या निर्णयामुळे चीनची सार्वभौमत्वचा धोक्यात येत असल्याचे चीनेन बोलले होते. मात्र, चीन आणि पाकिस्तानमध्ये मैत्रीपूर्ण संबध असूनही चीनने पाकिस्तानला उघडपणे पाठिंबा दर्शवला नाही.

Loading...

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.