Articles – InShorts Marathi https://inshortsmarathi.com InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट Tue, 18 Jun 2019 11:47:24 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=5.2.2 https://inshortsmarathi.com/wp-content/uploads/2018/09/cropped-Inshorts-JPG-1-1-32x32.jpg Articles – InShorts Marathi https://inshortsmarathi.com 32 32 148314367 ‘इंडियन फर्स्ट’-उमेश जाधव यांचा अनोखा उपक्रम https://inshortsmarathi.com/unique-initiative-of-indian-first-umesh-jadhav/ Tue, 18 Jun 2019 11:47:24 +0000 https://inshortsmarathi.com/?p=68937

पुलवामा हल्ल्यात हुतात्मा झालेल्या चाळीस सैनिकांच्या जन्मभूमी आणि स्मृतिस्थळावरील माती घेऊन पुलवामा येथे 15 फुटांचा भारताचा नकाशा बनविण्यात येणार आहे. देशभक्तीची मशाल तेवत ठेवण्यासाठी ‘मंड्या टू पुलवामा’ हा उपक्रम राबविण्याचे कलावंत उमेश जाधव यांनी ठरविले आहे. पुलवामा हल्ल्यातील ४० शहिदांसाठी तब्बल २० लाखांचा निधी बेंगळुरूमध्ये स्थायिक झालेल्या भूमिपुत्राच्या ‘मंड्या टू पुलवामा’ उपक्रमातून उभा राहात आहे. […]

InShortsMarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. ‘इंडियन फर्स्ट’-उमेश जाधव यांचा अनोखा उपक्रम InShorts Marathi.

]]>

पुलवामा हल्ल्यात हुतात्मा झालेल्या चाळीस सैनिकांच्या जन्मभूमी आणि स्मृतिस्थळावरील माती घेऊन पुलवामा येथे 15 फुटांचा भारताचा नकाशा बनविण्यात येणार आहे. देशभक्तीची मशाल तेवत ठेवण्यासाठी ‘मंड्या टू पुलवामा’ हा उपक्रम राबविण्याचे कलावंत उमेश जाधव यांनी ठरविले आहे.

पुलवामा हल्ल्यातील ४० शहिदांसाठी तब्बल २० लाखांचा निधी बेंगळुरूमध्ये स्थायिक झालेल्या भूमिपुत्राच्या ‘मंड्या टू पुलवामा’ उपक्रमातून उभा राहात आहे. विशेष म्हणजे देश-विदेशातील कलावंतांना एकत्र आणण्यासाठी स्थापन झालेल्या ‘म्युझिकॉज’ या ‘एनजीओ’अंतर्गत ‘मंड्या टू पुलवामा’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

सहा राज्यांत जाऊन हुतात्मांचे जन्मस्थळ आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे. नऊ एप्रिलला बंगळुरू येथील सीआरपीएफ (बीएलआर) डीआयजीपी, जीसी सनद कमल यांच्या हस्ते या मोहिमेस प्रारंभ झाला. या मोहिमेत मंडिया येथील हुतात्मा गुरू यांच्या स्मृती आणि जन्मस्थळाला भेट देत तेथील माती घेतली. देणगीतून जमा झालेल्या 50 हजार रुपयांची मदत त्याने हुतात्मा गुरू यांच्या कुटुंबीयांना केली. पुढे केरळ, तमिळनाडू आणि कनार्टक येथील हुतात्म्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. या मोहिमेत केरळ येथील अरुण आणि अनिश हे दोन युवकही जोडले गेले असल्याचे उमेशने सांगितले.

नागरिकांनी केवळ देणगी द्यावी, असा या उपक्रमाचा हेतू नाही. त्या उलट या उपक्रमाचा भाग म्हणून विविध रंगी टोप्या, बॅग, मातीची बाटली, टी-शर्ट, स्टिकर्स आदी वस्तुंची निर्मिती केली जात असून त्या वस्तुंच्या विक्रीतून मूळ उत्पादन खर्च वगळता शिल्लक रक्कम ही उपक्रमासाठी जमा केली जात आहे. त्याचवेळी उत्स्फूर्त देणगी देणारेही काही कमी नाहीत. लवकरच www.indianfirst.ngo ही वेबसाइटही सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे टोपी असो की टी-शर्ट, सर्व उत्पादनांवर ‘इंडियन फर्स्ट’ एवढेच नाव असणार आहे, असेही त्यांनी उमेश जाधव म्हणाले.

 

InShortsMarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. ‘इंडियन फर्स्ट’-उमेश जाधव यांचा अनोखा उपक्रम InShorts Marathi.

]]>
68937
वाचा- मंत्रिमंडळ निर्णय https://inshortsmarathi.com/cabinet-decision-4-june-2019/ Wed, 05 Jun 2019 13:02:40 +0000 https://inshortsmarathi.com/?p=68274

मुंबई महापालिकेच्या जीर्ण इमारती-चाळींच्या पुनर्विकास करारनाम्यावर एक हजार रुपये मुद्रांक शुल्क दिनांक ४ जून २०१९- मुंबई महापालिकेच्या मालकीच्या जीर्ण किंवा धोकादायक इमारती अथवा चाळींच्या पुनर्विकासासाठी होणाऱ्या त्रिपक्षीय करारनाम्यावर फक्त एक हजार रुपये इतकी मुद्रांक शुल्क आकारणी निश्चित करण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे संबंधित पुनर्विकास प्रकल्पांना गती मिळणार आहे. […]

InShortsMarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. वाचा- मंत्रिमंडळ निर्णय InShorts Marathi.

]]>

मुंबई महापालिकेच्या जीर्ण इमारती-चाळींच्या पुनर्विकास करारनाम्यावर एक हजार रुपये मुद्रांक शुल्क

दिनांक ४ जून २०१९- मुंबई महापालिकेच्या मालकीच्या जीर्ण किंवा धोकादायक इमारती अथवा चाळींच्या पुनर्विकासासाठी होणाऱ्या त्रिपक्षीय करारनाम्यावर फक्त एक हजार रुपये इतकी मुद्रांक शुल्क आकारणी निश्चित करण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे संबंधित पुनर्विकास प्रकल्पांना गती मिळणार आहे.

विकास नियंत्रण नियमावलीतील विनियम 33 (7) आणि 33 (9) यानुसार बृहन्मुंबई महापालिकेच्या मालकीच्या जुन्या किंवा मोडकळीस आलेल्या इमारती अथवा चाळींचा पुनर्विकास करण्यात येतो. दि. 30 सप्टेंबर 1969 पूर्वी बांधकाम केलेल्या स्वतंत्र चाळ वा इमारतींच्या पुनर्विकासासाठी 33 (7) हा विनियम आहे, तर 33 (9) नुसार समूह पुनर्विकास करण्यात येतो. जीर्ण किंवा धोकादायक इमारती-चाळींचा पुनर्विकास करण्यासाठी संबंधित रहिवाशांची नोंदणीकृत संस्था, या संस्थेने नियुक्त केलेला विकासक आणि महानगरपालिका यांच्या दरम्यान त्रिपक्षीय करार करण्यात येतो. हा करारनामा महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम तरतुदींनुसार मुद्रांक आकारणीस योग्य ठरतो. त्यामुळे आकारणी योग्य असलेले मुद्रांक शुल्क लोकहितासाठी फक्त एक हजार रुपये इतकेच निश्चित करण्यात आले आहे.

आरोग्य विज्ञान विद्यापीठ कर्मचाऱ्यांना वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती योजना लागू

नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात वैधानिक व शासन मंजूर पदावरील अधिकारी कर्मचाऱ्यांना वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती योजना लागू करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

राज्यात आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमासाठी 3 जून 1998 रोजी स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठास शासनाकडून मंजूर करण्यात आलेल्या पदांना आतापर्यंत वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती करण्यात येत नव्हती. आजच्या निर्णयानंतर विद्यापीठात कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांना वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या योजनेसाठी विद्यापीठाच्या स्वनिधीतून कायमस्वरुपी खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ही योजना शासनाने विहित केलेला तपशील, अटी व शर्ती यानुसार लागू होणार आहे.

खादी ग्रामोद्योग मंडळाच्या कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी मिळणार

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2006 पासून सहाव्या वेतन आयोगाची सुधारित श्रेणी लागू करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. मंडळातील कार्यरत 410 अधिकारी-कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे.

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळातील कर्मचाऱ्यांना 1 एप्रिल 2009 पासून सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात आल्या आहेत. मंडळाच्या 481 सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2006 पासून सहाव्या वेतन आयोगाचे लाभ देण्यात आले आहेत. त्याच धर्तीवर मंडळातील कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार वेतनाची थकबाकी देण्याबाबत विनंती करण्यात आली होती. त्याचा विचार करून मंडळातील कार्यरत 410 कर्मचाऱ्यांना दि. 1 जानेवारी 2006 ते 31 मार्च 2009 मधील वेतनाची 6 कोटी 75 लाख 79 हजार 407 रुपयांची थकबाकी देण्यास मान्यता देण्यात आली.

आर्मी वेलफेअर एज्युकेशन सोसायटीला मिळालेल्या जमिनीचे मुद्रांक शुल्क माफ

मुंबई येथील राधा कलियानदास दरियानी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे पुणे येथील आर्मी वेलफेअर एज्युकेशन सोसायटीला बक्षीस दिलेल्या कान्हे येथील जमिनीचे मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

देशाचे संरक्ष्‍ाण करणाऱ्या जवानांच्या कल्याणासाठी आर्मी वेलफेअर एज्युकेशन सोसायटी ही संस्था कार्यरत आहे. या संस्थेच्या माध्यमातून जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी शैक्षणिक कार्य करण्यात येते. त्यामुळे मुंबईच्या राधा कलियानदास दरियानी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आर्मी वेलफेअर एज्युकेशन सोसायटीला मावळ तालुक्यातील कान्हे येथील सात हजार 403 चौरस मीटर जमीन शैक्षणिक कार्यासाठी बक्षीस देण्यात आली आहे. या जमिनीचे मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

सहकारी संस्थांसाठी अटल अर्थसहाय्य योजनेस मुदतवाढ

नवीन सहकारी संस्थांच्या प्रकल्पांना अर्थसहाय्य देण्यासाठी 2018-19 मध्ये सहकारी संस्थांसाठी अटल अर्थसहाय्य योजना सुरु करण्यात आली आहे. ही योजना सन 2019-20 मध्येही सुरू ठेवण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

सहकारी संस्थांना बदलत्या काळातील आव्हाने पेलण्यासाठी व्यवसायाभिमुख प्रकल्प राबविणे आवश्यक आहे. विविध व्यवसाय राबविण्यासह त्यांच्या व्यवसाय वृद्धीसाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे. राज्यात महाराष्ट्र सहकार विकास महामंडळामार्फत ही योजना राबविली जात आहे. या योजनेंतर्गत पात्रतेचे निकष पूर्ण करणाऱ्या सहकारी संस्थांनी स्वनिधीची गुंतवणूक करून सुरू केलेल्या कृषीपूरक, सुगीपश्चात प्रकल्प तसेच बिगर कृषी नाविन्यपूर्ण प्रकल्पांसाठी सहकार विकास महामंडळामार्फत कर्ज व अनुदान दिले जाणार आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी सिडकोला मुद्रांक शुल्क व स्वामित्वधनातून सूट

सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्त्वावर विकसित करण्यात येत असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी सवलत करारनाम्यावरील मुद्रांक शुल्क आणि उत्खननातील गौण खनिजांवरील स्वामित्वधनातून सूट देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
नवी मुंबई येथे सार्वजनिक खाजगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर ग्रीन फिल्ड आंतरराष्ट्रीय विमानतळ विकसित करण्यासाठी सिडको महामंडळ हे नोडल एजन्सी म्हणून काम पाहत आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ विकासाशी संबंधित सिडको व सवलतधारक यांच्यामध्ये सवलत करारनामा करण्यात येत आहे. या करारनाम्यावर महसूल व वन विभागाच्या 30 एप्रिल 2016 च्या अधिसूचनेच्या अनुच्छेद क्र. 25 व 36 नुसार आकारणी योग्य असलेले मुद्रांक शुल्क माफ करण्यात आले आहे. जमीन हस्तांतरणासाठी सवलत करारनाम्यांशिवाय इतर कोणतेही भाडेपट्टा करारनामे होणार नसल्याने सिडको व सवलतधारक यांच्या दरम्यानच्या या करारनाम्यावरील पहिल्या दस्तावेजांना मुद्रांक शुल्कातून सूट देण्यास मान्यता देण्यात आली.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी सिडको करत असलेल्या उत्खननातून निघणारे खडक, मुरूम इत्यादी स्वरुपातील गौण खनिजांचा वापर केवळ सिडको परिसरातील सिडको किंवा शासनाच्या अन्य प्रकल्पांमध्ये उपयोग करण्यात येणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन (विकास व विनियम) (सुधारणा) नियम-2017 अंतर्गत नियम 46 च्या परंतुकानुसार सिडको महामंडळाला स्वामित्वधन देण्यापासून 100 टक्के सूट देण्यास मान्यता देण्यात आली. तथापि, यासंदर्भातील निविदा प्रक्रिया झाली असल्यास निविदेतील अटी-शर्ती कायम ठेवण्याचा निर्णयही घेण्यात आला.

कृषी विद्यापीठासह पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ अधिनियमात सुधारणा करण्यास मान्यता

महाराष्ट्र कृषी विद्यापीठ अधिनियम 1983 आणि महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ अधिनियम 1998 च्या कलम 9 मध्ये सुधारणा करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
रत्नागिरी जिल्ह्यातील शिरगाव येथील मत्स्य विज्ञान महाविद्यालयातून अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना 17 नोव्हेंबर 2000 नंतर डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाकडून देण्यात आलेली पदविका प्रमाणपत्रे व पदव्या पूर्वलक्षी प्रभावाने विधिग्राह्य करण्यास बैठकीत मान्यता देण्यात आली. हा निर्णय महाराष्ट्र कृषी विद्यापीठ अधिनियम 1983 आणि महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ अधिनियम 1998 च्या कलम 9 मध्ये सुधारणा होईपर्यंतच्या कालावधीसाठी लागू राहणार आहे. त्याचप्रमाणे मत्स्यविद्या शाखेतील पदविका, पदवी, पदव्युत्तर व आचार्य इत्यादी पदव्या देण्याचे अधिकार अपवाद म्हणून डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठास देण्यासही मान्यता देण्यात आली.

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ अधिनियम 1998 नुसार नागपूर येथे महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाची स्थापना करण्यात आली आहे. या अधिनियमातील कलम 9 मध्ये असलेल्या तरतुदीनुसार कृषी विषयातील पदवी व पदविका प्रमाणपत्र देण्याचे अधिकार कृषी विद्यापीठांना आहेत. या अधिनियमानुसार शिरगाव येथील मत्स्य विज्ञान महाविद्यालय तसेच पशु व मत्स्य विज्ञानाशी संबंधित इतर महाविद्यालये, संस्था, प्रशिक्षण केंद्र, संशोधन केंद्र यांना महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठांशी संलग्नित करण्यात आले आहे. तथापि, 17 नोव्हेंबर 2000 च्या अधिसूचनेनुसार शिरगाव येथील मत्स्य विज्ञान महाविद्यालयास पूर्वीप्रमाणेच डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाशी संलग्नित करण्यात आले. परंतु, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विज्ञापीठ अधिनियम 1998 आणि महाराष्ट्र कृषी विद्यापीठे अधिनियम 1983 च्या कलमांमध्ये आवश्यक त्या सुधारणा न केल्यामुळे शिरगाव येथील महाविद्यालयातून पदविका, पदवी आणि आचार्य हे अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना 17 नोव्हेंबर 2000 नंतर देण्यात आलेल्या पदव्या विधिग्राह्य ठरत नव्हत्या. या वस्तुस्थितीचा विचार करता 17 नोव्हेंबर 2000 ते संबंधित दोन्ही अधिनियमातील कलम 9 मध्ये सुधारणा होईपर्यंतच्या कालावधीमध्ये डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाकडून प्रदान करण्यात आलेल्या पदविका, पदवी प्रमाणपत्रे पूर्वलक्षी प्रभावाने विधिग्राह्य करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला.

वाचा- मंत्रिमंडळ निर्णय

InShortsMarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. वाचा- मंत्रिमंडळ निर्णय InShorts Marathi.

]]>
68274
निवडणूकीसाठी शेतकऱ्यांना मोफत वीजेचे गाजर? https://inshortsmarathi.com/free-power-supply-to-farmer/ Wed, 05 Jun 2019 10:42:24 +0000 https://inshortsmarathi.com/?p=68233

विधानसभा निवडणूका काही महिन्यावरच येऊन ठेपलेल्या आहेत. विधानसभा निवडणूका लक्षात घेता शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. शेतकऱ्यांच्या कृषीपंपांची थकबाकी २२ हजार कोटी रुपयांहून अधिक झाली असून दुष्काळामुळे वीजबिल वसुली ठप्प झाली आहे. त्यामुळे सुमारे तीन हजार कोटी रुपयांचा आर्थिक बोजा उचलून मोफत वीज पुरविल्यास विधानसभा निवडणुकीत राजकीय फायदा घेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. […]

InShortsMarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. निवडणूकीसाठी शेतकऱ्यांना मोफत वीजेचे गाजर? InShorts Marathi.

]]>

विधानसभा निवडणूका काही महिन्यावरच येऊन ठेपलेल्या आहेत. विधानसभा निवडणूका लक्षात घेता शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

शेतकऱ्यांच्या कृषीपंपांची थकबाकी २२ हजार कोटी रुपयांहून अधिक झाली असून दुष्काळामुळे वीजबिल वसुली ठप्प झाली आहे. त्यामुळे सुमारे तीन हजार कोटी रुपयांचा आर्थिक बोजा उचलून मोफत वीज पुरविल्यास विधानसभा निवडणुकीत राजकीय फायदा घेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना याबाबत विचारता आणखी आर्थिक सवलत देऊन पुन्हा कृषी संजीवनी योजना देता येईल का,हे विचाराधीन असून शेतकऱ्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय लवकरच घेतला जाईल, असे स्पष्ट केले.

दुष्काळ प्रश्नी शरद पवार घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

InShortsMarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. निवडणूकीसाठी शेतकऱ्यांना मोफत वीजेचे गाजर? InShorts Marathi.

]]>
68233
किल्ले रायगड विकासाचे काम समाधानकारक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस https://inshortsmarathi.com/devendra-fadnvis-comment-on-raigadh/ Tue, 04 Jun 2019 10:57:38 +0000 https://inshortsmarathi.com/?p=68229

छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ले रायगड या स्वराजाच्या राजधानीचे जतन करुन हा देशभक्तीचा जाज्वल्य इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने भारतीय पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली किल्ले रायगड विकास प्राधिकरणाचे काम योग्य पद्धतीने सुरु आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किल्ले रायगडाच्या जतन संवर्धनाच्या कामाबद्दल आज येथे समाधान व्यक्त केले. यानिमित्ताने सर्व शिवप्रेमींची मागणी पूर्ण […]

InShortsMarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. किल्ले रायगड विकासाचे काम समाधानकारक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस InShorts Marathi.

]]>

छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ले रायगड या स्वराजाच्या राजधानीचे जतन करुन हा देशभक्तीचा जाज्वल्य इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने भारतीय पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली किल्ले रायगड विकास प्राधिकरणाचे काम योग्य पद्धतीने सुरु आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किल्ले रायगडाच्या जतन संवर्धनाच्या कामाबद्दल आज येथे समाधान व्यक्त केले. यानिमित्ताने सर्व शिवप्रेमींची मागणी पूर्ण होत आहे, असेही त्यांनी सांगितले.

किल्ले रायगड विकासासाठी शासनाने 606 कोटी रुपयांचा आराखडा मंजूर केला असून पहिल्या टप्प्यात 59 कोटी रुपयांची कामे हाती घेण्यात आली असून ही कामे पूर्णत्वाकडे आली आहेत. यासंदर्भात किल्ले रायगड येथे आज मुख्यमंत्री श्री.फडणवीस हे जतन संवर्धन कामांची पाहणी करण्यासाठी आले होते. त्यांच्यासमवेत किल्ले रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार छत्रपती संभाजी राजे, आमदार प्रवीण दरेकर, आमदार अनिकेत तटकरे, आमदार भरतशेठ गोगावले, रघुजीराजे आंग्रे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, कोकण विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक निकेत कौशिक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर, भारतीय पुरातत्व विभागाचे मुंबई विभागाचे निर्देशक बिपिनचंद्र नेगी, रायगड किल्ल्याचे प्रभारी जंगले, अपर जिल्हाधिकारी भरत शितोळे, प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार आदी उपस्थित होते.

आपल्या संबोधनात श्री. फडणवीस म्हणाले की, रायगड किल्ल्यावरील पुरातन वास्तूंचे जतन व संवर्धन हे इतिहासाशी निगडीत केले जात आहे. शिवाय किल्ले परिसरात पर्यटकांना येण्यासाठी पायाभूत सुविधांची निर्मिती, किल्ल्याकडे येणारे रस्ते रुंदीकरण करणे, त्यासाठी जमीन संपादन प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. त्यासाठी लोकांचे चांगले सहकार्य मिळत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी श्री.फडणवीस यांनी पाचाड येथे राजमाता जिजाऊ साहेब यांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर ते रोप-वे ने किल्ल्यावर दाखल झाले. रोप वे अप्पर स्टेशन पाथवे येथून कुशावर्त तलाव, वाघ दरवाजाकडे जाणाऱ्या या मार्गाच्या पुनरुज्जीवनाच्या कामाची पाहणी त्यांनी केली. त्यानंतर ते होळीचा माळमार्गे बाजारपेठ पाहून जगदीश्वराच्या मंदिराकडे गेले. तेथे त्यांनी जगदीश्वराचे दर्शन घेतले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. तेथून ते पुन्हा बाजारपेठ, होळीचा माळमार्गे हत्ती तलाव येथे आले. तेथील कामांचीही त्यांनी पाहणी केली. त्यानंतर शिर्काई देवीचे दर्शन घेऊन ते हत्तीखान्यात आले. येथे रायगड विकास प्राधिकरणाच्या आतापर्यंत झालेल्या कामांचे व्हीडिओ चित्रफितीद्वारे सादरीकरण करण्यात आले. यावेळी माहिती देण्यात आली की रायगडावरील पाणीसाठ्याच्या उपलब्धतेसाठी गडावरील 22 तलावांमधील गाळ काढणे व गळती दुरुस्त करण्याचे काम करण्यात आल्याने गडावर मुबलक पाण्याची उपलब्धता आहे.

त्यानंतर श्री. फडणवीस हे होळीचा माळ मार्गे नगारखाना व तेथून राजसदरेवर आले. राजसदरेवर सिंहासनावरील शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर बालेकिल्ला, राणीवसा पाहून ते मेणा दरवाजामार्गे खाली उतरले.

InShortsMarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. किल्ले रायगड विकासाचे काम समाधानकारक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस InShorts Marathi.

]]>
68229
पवार साहेब माझ्यासाठी देव माणूस- आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा मुलगा https://inshortsmarathi.com/farmer-son-commented-on-sharad-pawar/ Tue, 04 Jun 2019 09:23:06 +0000 https://inshortsmarathi.com/?p=68204

पवार साहेबांनी दिलेला शब्द पाळला आणि नोकरीला लावले. म्हणून पवार साहेब माझ्यासाठी देवमाणूस. सरकारने पाठ फिरवली. पण लोकसभा निवडणूकीच्या धामधुमीत व्यस्त असतानाही त्यांनी दिलेला शब्द ते विसरले नाही, अशी माहिती आर्थिक पिळवणूकीला कंटाळून आत्महत्या करणाऱ्या दिलीप ढवळे यांच्या मुलाने दिली. १२ एप्रिल रोजी उस्मानाबादमधील दिलीप ढवळे यांनी काही स्थानिक आधुनिक सरंजामदारांनी केलेल्या आर्थिक पिळवणूकीला कंटाळून […]

InShortsMarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. पवार साहेब माझ्यासाठी देव माणूस- आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा मुलगा InShorts Marathi.

]]>

पवार साहेबांनी दिलेला शब्द पाळला आणि नोकरीला लावले. म्हणून पवार साहेब माझ्यासाठी देवमाणूस. सरकारने पाठ फिरवली. पण लोकसभा निवडणूकीच्या धामधुमीत व्यस्त असतानाही त्यांनी दिलेला शब्द ते विसरले नाही, अशी माहिती आर्थिक पिळवणूकीला कंटाळून आत्महत्या करणाऱ्या दिलीप ढवळे यांच्या मुलाने दिली.

१२ एप्रिल रोजी उस्मानाबादमधील दिलीप ढवळे यांनी काही स्थानिक आधुनिक सरंजामदारांनी केलेल्या आर्थिक पिळवणूकीला कंटाळून आत्महत्या केली होती. तेव्हा लोकसभेची निवडणूक लागलेली आणि प्रचाराचा धुमाकूळ चालू होता. दिलीप ढवळे याने आत्महत्या केल्याने महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. घटना घडल्यनंतर चार-पाच दिवसांनी मा.शरद पवार साहेबांनी आमच्या घरी भेट दिली.

पवार साहेब गेल्यानंतर इतर राजकीय लोकांप्रमाणे त्यांचे अश्‍वासनही विरुन जाईल असे वाटले. कारण सांत्वन करताना एक आधार म्हणून बोलणे आणि नक्कीच आधार देणे यात फार फरक असतो.आणि राजकारणातील लोकांकडून तरी अश्‍वासनाची पूर्तता होताना याची देही याची डोळा कधी आमच्या जिल्ह्यात तरी पाहिलेले नाही. म्हणून त्याही बाबतीत आमची उदासिनता कायम होती. परंतु साहेबांनी भेट देऊन चार दिवसही गेले नाहीत तर बारामतीहून विद्या प्रतिष्ठान मधून फोन आला.

3 जून पासून कामावर रुजू होण्यासाठी सांगितले. या कालावधीमध्ये निवडणूका, प्रचार, निकाल या सगळ्या गोष्टी होत होत्या. तरीही पवार साहेब या व्यस्त कामातून वेळ काढून संस्थेमध्ये निखील ला घेतले की नाही याची चौकशी करत होते. म्हणजे दिलेला शब्द पाळला, अशी माहिती राज ढवळे यांनी दिली.

या घटनेला जबाबदार असणार्‍या संबंधित लोकांवर गुन्हे दाखल झाले नाही. तसेच आत्महत्याग्रस्त कुटुंबियांनाही शासनाकडून अद्यापही कोणती मदत मिळाली नाही.

शासकीय नोकरीत दिव्यांगांसाठी ४ टक्के आरक्षण – राज्यमंत्री दिलीप कांबळे

InShortsMarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. पवार साहेब माझ्यासाठी देव माणूस- आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा मुलगा InShorts Marathi.

]]>
68204
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाची शपथ महाराष्ट्रातून ४ कॅबिनेट व ३ राज्यमंत्री https://inshortsmarathi.com/naredra-modi/ Fri, 31 May 2019 10:59:49 +0000 https://inshortsmarathi.com/?p=68169

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील 58 सदस्यीय मंत्रिमंडळास आज राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी शपथ दिली. या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून 4 कॅबिनेट व 3 राज्यमंत्री अशा एकूण 7 मंत्र्यांचा समावेश आहे. राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात आयोजित शानदार समारंभात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सहभागी घटक पक्षांच्या सदस्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये 25 कॅबिनेट मंत्री, […]

InShortsMarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाची शपथ महाराष्ट्रातून ४ कॅबिनेट व ३ राज्यमंत्री InShorts Marathi.

]]>

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील 58 सदस्यीय मंत्रिमंडळास आज राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी शपथ दिली. या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून 4 कॅबिनेट व 3 राज्यमंत्री अशा एकूण 7 मंत्र्यांचा समावेश आहे.

राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात आयोजित शानदार समारंभात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सहभागी घटक पक्षांच्या सदस्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये 25 कॅबिनेट मंत्री, 9 राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) व 24 राज्यमंत्री यांचा समावेश आहे. यावेळी ब्रेक्सिस्ट देशाचे प्रमुख, उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू, महाराष्ट्राचे राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्यासह विविध राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध राज्यांचे मुख्यमंत्री, मंत्री, लोकप्रतिनिधी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्रातून 4 कॅबिनेट व 3 राज्यमंत्री

श्री. नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील चार कॅबिनेट मंत्र्यांचा समावेश आहे. या कार्यक्रमात नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, पियुष गोयल आणि अरविंद सावंत यांना राष्ट्रपती राम नाथ कोंविद यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून पद व गोपनीयतेची शपथ दिली. तर रामदास आठवले, रावसाहेब दानवे आणि संजय धोत्रे यांना राष्ट्रपती राम नाथ कोंविद यांनी राज्यमंत्री म्हणून पद व गोपनीयतेची शपथ दिली.

याआधी वर्ष २०१४ ते २०१९ या कालावधीत नितीन गडकरी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात भूपृष्ठ वाहतूक व रस्ते विकास मंत्री, जलसंसाधन मंत्री म्हणून तर पियुष गोयल यांनी उर्जा मंत्रालय व कोळसा मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), रेल्वे मंत्री आणि अर्थमंत्री म्हणून तर प्रकाश जावडेकर यांनी माहिती व प्रसारण मंत्री, पर्यावरणमंत्री आणि मनुष्यबळ विकास मंत्री म्हणून मंत्रिपद भूषविले आहे. तर रामदास आठवले यांनी सामाजिक न्याय व अधिकारिता विभागाचे राज्यमंत्री म्हणून पद भूषविले आहे. रावसाहेब दानवे यांनीही राज्यमंत्री पद भूषविले होते. अरविंद सावंत आणि संजय धोत्रे यांनी प्रथमच केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

आर. के. लक्ष्मण यांचे काम ‘टाईमलेस’ राहील – नरेंद्र मोदी

InShortsMarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाची शपथ महाराष्ट्रातून ४ कॅबिनेट व ३ राज्यमंत्री InShorts Marathi.

]]>
68169
अहिल्यादेवींना ‘पुण्यश्लोक’ बनविणारे पाच महान गुण https://inshortsmarathi.com/punyashlok-ahilyadevi-holkar/ Thu, 30 May 2019 11:31:23 +0000 https://inshortsmarathi.com/?p=68148

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याजवळ लोकोत्तर ठरणारे अनेक महान गुण होते. त्या गुणांच्या जोरावर त्यांनी केवळ माळवा प्रांतातीलच नव्हे तर भारतवर्षातील जनतेच्या मनात अमीट ठसा उमटवला. सम्राट चंद्रगुप्त मौर्य, सम्राट अशोक, छत्रपती शिवराय यांच्या परंपरेतील लोकराज्याचा वारसा अहिल्यादेवींनी पुढे नेला. अहिल्यादेवींना पुण्यश्लोक बनवणारे पाच महान गुण जागतिक अभ्यासकांनी अधोरेखित केले आहेत. ते महान गुण अहिल्यादेवींच्या चरित्रात दिसून येतात. […]

InShortsMarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. अहिल्यादेवींना ‘पुण्यश्लोक’ बनविणारे पाच महान गुण InShorts Marathi.

]]>

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याजवळ लोकोत्तर ठरणारे अनेक महान गुण होते. त्या गुणांच्या जोरावर त्यांनी केवळ माळवा प्रांतातीलच नव्हे तर भारतवर्षातील जनतेच्या मनात अमीट ठसा उमटवला. सम्राट चंद्रगुप्त मौर्य, सम्राट अशोक, छत्रपती शिवराय यांच्या परंपरेतील लोकराज्याचा वारसा अहिल्यादेवींनी पुढे नेला. अहिल्यादेवींना पुण्यश्लोक बनवणारे पाच महान गुण जागतिक अभ्यासकांनी अधोरेखित केले आहेत. ते महान गुण अहिल्यादेवींच्या चरित्रात दिसून येतात.

१. आपण जे घडविले त्याचे प्राणपणाने रक्षण

अहिल्याबाई होळकरांचा जन्म ३१ ऑगस्ट १७२५ रोजी महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चोंडी या खेड्यात झाला. माणकोजी शिंदे-पाटील यांची अहिल्या नावाची ही मुलगी लहानपणापासूनच धाडसी होती. तसेच राज्यकर्त्यांना आवश्यक असणारे सर्व गुण तिच्याजवळ लहानपणापासूनच होते.

एकदा चोंडी गावात थोरले बाजीराव पेशवे यांच्या सैन्याचा तळ पडला होता. सीना नदीच्या काठी असलेल्या एका देवालयात दर्शनासाठी म्हणून छोटी अहिल्या आपल्या आईबरोबर गेली होती. तेथे नदीच्या वाळूत खेळताना अहिल्येने वाळूचे एक शिवलिंग बनविले. तेवढ्यात सैन्यदलातील एकाचा घोडा उधळला. उधळलेला घोडा आपल्याच दिशेने येत असल्याचे पाहून अहिल्याबरोबरच्या मैत्रिणी भिऊन पळून गेल्या. मात्र अहिल्या मुळीच डगमगली नाही. तिने आपण तयार केलेल्या शिवलिंगावर पालथे पडून त्या शिवलिंगाचे रक्षण केले.

तेवढय़ात पाठीमागून आलेल्या श्रीमंतांनी थोड्याशा जरबेच्या आवाजातच अहिल्येला म्हटले, पोरी तुला घोड्याने तुडवले असते तर? त्यावर अहिल्याबाई आपले डोळे श्रीमंतांवर रोखत म्हणाली, हे शिवलिंग मी घडविले आहे व आपण जे घडविले आहे त्याचे प्राणपणाने रक्षण करावे असे थोरली माणसे सांगतात. मी तेच केले आहे. तिचे बाणेदार उत्तर ऐकून श्रीमंत तर खूष झालेच परंतु त्यांच्याबरोबर असलेले सरदार मल्हारराव होळकर यांनी छोट्या अहिल्येला आपली सून करून घेण्याचे ठरविले. त्याप्रमाणे मल्हाररावांनी तिला आपली सून करून घेतली आणि अहिल्याबाईंनी देखील नंतर मल्हाररावांचा निर्णय सार्थ ठरविला व होळकर घराण्याची कीर्ती सर्वदूर पोहोचविली.

२. प्रजासेवा ती देवपूजा

बळ, बुद्धी आणि चातुर्य आहे तोच स्वकर्तृत्वावर लोकाभिमुख राजा बनू शकतो. अशी अहिल्यादेवी होळकर यांची धारणा होती. राजाने प्रजासेवा हीच देवपूजा मानावी या उदात्त विचारांनी त्यांनी राज्य केलं. त्यांच्या राज्यकारभारात याचे प्रतिबिंब ठायी ठायी दिसत

श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या आग्रहावरून सती जाण्यापेक्षा जनहित महत्त्वाचे मानले. अहिल्यादेवी म्हणत ‘‘सती जाणे कोणत्या शास्त्रात नाही आणि सती गेल्याने कोणताही मोक्ष किंवा पुण्य मिळत नाही. अशा परंपरेची पद्धत बंद केली पाहिजे.’’ सती प्रथा बंद करण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले.

अहिल्यादेवींनी आपल्या होळकर शाहीत दत्तक वारसा मंजू्र करून लोकांच्या संसारात सुखाची लाट निर्माण केली. अहिल्यादेवींनी आपल्या राज्यातील लोकांना जाती किंवा धर्माच्या नावाखाली अस्पृश्यता पाळण्यावर बंदी घातली आणि सर्वांना समान शिकवण दिली. महात्मा फुले यांनी आपल्या शाळेचे नाव अहिल्या आश्रम ठेवले तर राजर्षी शाहू महाराजांनी अस्पृश्यांसाठीच्या दवाखान्याला अहिल्या स्मरणार्थ दवाखाना असे नाव दिले.अशी ही थोर समाजसुधारक राणी होती.

३. ममता आणि समता

अहिल्यादेवींनी जंगलतोडीविरुद्ध  कुऱ्हाडबंदी आणली. प्रत्येक घरातील माणसाच्या नावावर पाच झाडे असे गणित देऊन झाडे लावून घेतली.जे झाडे लावत नाहीत त्यांच्याकडून दंड वसूल करण्याचा आदेश काढला.

आपल्या स्वतःच्या मुलीचा आंतरजातीय विवाह करून स्वतःच्या घरापासून सुधारणेची सुरूवात केली.

अहिल्यादेवींनी त्याकाळी हुंडाविरोधी कायदा करून हुंडा देणाऱ्या घेणाऱ्या व मध्यस्ती करणाऱ्यांवर दंड ठोठावला. परराज्याशी सलोख्याचे संबध राहावे म्हणून त्यांनी पंधरा राज्यात आपले वकील नेमले होते. इतर राज्यातील नऊ वकील होळकर राज्याच्या दरबारात होते. मातोश्री अहिल्यादेवींनी निर्माण केलेल्या प्रशासन व्यवस्थेत प्रजेची उन्नती व विकास,सामाजिक शांतता, सुव्यवस्था, समता व ममत्व,न्याय,स्वातंत्र्य या मूलभूत मानवी मूल्यांचा प्रत्यक्ष आस्वाद त्या काळात जनता घेत होती. यापासून आजच्या प्रशासनाला खूप काही शिकण्यासारखे आहे.

४. लोकांची गाऱ्हाणी ऐकावी राजाने

इ.स. १७६५ मध्ये सत्तेसाठी झालेल्या एका लढाईदरम्यान लिहिलेल्या एका पत्रावरून मल्हाररावांचा अहिल्यादेवींच्या कर्तृत्वावर किती विश्वास होता हे दिसून येते. “चंबळ पार करून ग्वाल्हेर येथे जावा. तेथे तुम्ही ४-५ दिवस मुकाम करू शकता.तुम्ही मोठे सैन्य ठेवू शकता व त्यांचे शस्त्रांसाठी योग्य तजवीज करा…..कूच करतांना,मार्गावर तुम्ही सुरक्षेसाठी चौक्या लावा.”

पूर्वीच शासक म्हणून तरबेज झाल्यामुळे, मल्हारराव व मुलाच्या मृत्यूनंतर, अहिल्यादेवींनी स्वतःलाच राज्यकारभार पाहू देण्याची अनुज्ञा द्यावी अशी पेशव्यांना विनंती केली. त्यांनी शासन करण्यास माळव्यात अनेकांचा विरोध होता, पण होळकरांचे सैन्य अहिल्यादेवींच्या नेतृत्वाखाली काम करण्यास उत्सुक होते. अहिल्यादेवी सैनिकी कवायतीत हत्तीच्या हौद्याच्या कोपऱ्यात चार धनुष्य आणि बाणांचे भाते ठेवत असत, असे म्हणतात.

पेशव्यांनी परवानगी दिल्यावर, ज्या माणसाने तिला विरोध केला होता, त्यास चाकरीत घेऊन, तुकोजीराव होळकर(मल्हाररावांचा दत्तक पुत्र) यास सैन्याचा मुख्य करून,अहिल्यादेवी होळकरांनी पूर्ण दिमाखात माळव्यास प्रयाण केले. अहिल्यादेवींनी पडदा प्रथा कधीच पाळली नाही. त्या रोज जनतेचा दरबार भरवित असत व लोकांची गाऱ्हाणी ऐकण्यास नेहमीच उपलब्ध असत. जरी राज्याची राजधानी ही नर्मदातीरावर असलेल्या महेश्वर येथे होती तरीही, इंदूर या खेड्याचा विकास करून त्याचे सुंदर मोठ्या शहरात रूपांतर करणे, हे अहिल्यादेवींनीच केलेले फार मोठे काम होते. त्यांनी माळव्यात रस्ते व किल्ले बांधले, अनेक उत्सव भरवले, हिंदू मंदिरांमध्ये कायमस्वरूपी पूजा सुरू राहावी म्हणून अनेकवेळा दान दिले, माळव्याबाहेरही त्यांनी मंदिरे, घाट, विहिरी, तलाव व धर्मशाळा बांधल्या.

५. देव, देश आणि धर्मासाठी सारे काही

भारतीय संस्कृती कोशात अहिल्यादेवी होळकरांनी केलेल्या बांधकामांची यादी आहे-काशी,गया, सोमनाथ,अयोध्या, मथुरा, हरिद्वार, कांची, अवंती, द्वारका, बद्रीकेदार, रामेश्वर व जगन्नाथपुरी वगैरे. अहिल्यादेवींस, सावकार, व्यापारी, शेतकरी इत्यादी आर्थिकदृष्ट्या सुदृढ झालेले बघून आनंद होत असे. परंतु त्यांनी त्यांच्यावर आपला अधिकार असल्याचे कधीच जाणवू दिले नाही. त्यांनी सर्व राज्यकारभार हा सुखी व धनाढ्य लोकांकडून नियमांतर्गत मिळालेल्या धनापासून चालविला होता, असे दिसते.

अहिल्यादेवींनी जनतेच्या/रयतेच्या काळजीपोटी अनेक गोष्टी केल्या. त्यांनी अनेक विधवांना पतीची मिळकत त्यांच्यापाशीच ठेवण्यात मदत केली. अहिल्यादेवींच्या राज्यात कोणीही विधवा मुलाला दत्तक घेऊ शकत असे. एकदा त्यांच्या एका मंत्र्याने लाच घेतल्याशिवाय दत्तक घेण्याच्या मंजुरीस नकार दिला, तेव्हा अहिल्यादेवींनी दत्तक विधानाचा कार्यक्रम स्वतः प्रायोजित करून, रीतसर कपडे व दागिन्यांचा आहेर दिला. अहिल्यादेवी होळकरांच्या स्मृतीस अभिवादन म्हणून, सन १९९६ मध्ये, इंदुरातील नागरिकांनी अहिल्यादेवींच्या नावाने एक पुरस्कार सुरू केला. तो, दरवर्षी, जनसेवेचे विशेष काम करणाऱ्यास दिला जातो. भारताच्या प्रधानमंत्र्यांनी पहिल्या वर्षी तो पुरस्कार नानाजी देशमुखांना दिला.

त्यांच्या स्मरणार्थ, इंदूर विद्यापीठास अहिल्यादेवी होळकर असे नाव दिलेले आहे.

भिल्ल व गोंड या राज्याच्या सीमेवर असलेल्या जमातींमधील वाद अहिल्यादेवींनी सोडविण्याचा प्रयत्न केला. त्यांनी त्या लोकांना पहाडातील निरुपयोगी जमीन दिली आणि त्यांना, त्या क्षेत्रातून जाणाऱ्या सामानावर थोडा ‘कर’ घेण्याचा अधिकार दिला. याही बाबतीत, (आंग्ल लेखक) ‘माल्कम’ यांच्यानुसार, अहिल्यादेवींनी ‘त्यांच्या सवयींवर लक्ष ठेवले’.

महेश्वर येथील अहिल्यादेवींची राजधानी ही जणू काव्य, संगीत, कला व उद्योग यांची संस्थाच होती. महाराष्ट्रातील प्रसिद्ध मराठी कवी मोरोपंत व शाहीर अनंतफंदी यांना व संस्कृत विद्वान खुशालीराम यांना अहिल्यादेवींनी आश्रय दिला. कारागीर, मूर्तिकार व कलाकारांना त्यांच्या राजधानीत सन्मान व वेतन मिळत असे. त्यांनी महेश्वर शहरात एक कपड्याची गिरणीपण सुरू केली.

एकोणीसाव्या व विसाव्या शतकातील, भारतीय, इंग्रजी व अमेरिकन इतिहासकार हे मान्य करतात, अहिल्यादेवी होळकरांस माळवा व महाराष्ट्रात, त्या काळी व आताही, संतांचा सन्मान दिला जातो. इतिहासाच्या कोणाही अभ्यासकास ते मत खोडून काढण्याजोगे आजवर काहीही सापडलेले नाही. या पाच महान गुणांशिवाय अहिल्यादेवी यांच्याजवळ असंख्य गुण होते. त्यामुळे त्यांचं जीवन तत्वज्ञानी राणी म्हणून ख्यातकीर्त झालं. पण ढोबळमानाने पाच महान गुण या लेखात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्या गुणांचा आजही अभ्यास होत आहे. कोणत्याही काळात राज्यकर्त्यांना या गुणांपासून प्रेरणा मिळेल अशी मला खात्री वाटते.

अहिल्यादेवी यांच्या लोकोत्तर प्रेरणांचा जागर करत त्यांना अभिवादन, वंदन करण्यासाठी ३१ मे रोजी जयंती महोत्सव समिती  सालाबादप्रमाणे लोकोत्सव साजरा करणार आहे. या लोकोत्सवात आपण सर्वजणांनी सहभागी व्हावे असे मी आवाहन करतो.

महत्त्वाच्या बातम्या –

– प्रा. राम शिंदे

जलसंधारण आणि इतर मागासवर्ग कल्याण मंत्री, महाराष्ट्र राज्य

InShortsMarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. अहिल्यादेवींना ‘पुण्यश्लोक’ बनविणारे पाच महान गुण InShorts Marathi.

]]>
68148
महिला ‘गाईड’ सांगताहेत वाघोबाच्या साम्राज्याची गोष्ट! ताडोबा-अंधारी, मेळघाट आणि पेंच व्याघ्र प्रकल्पात महिला गाईड https://inshortsmarathi.com/woman-guide/ Wed, 29 May 2019 13:36:33 +0000 https://inshortsmarathi.com/?p=68091

आपण वन पर्यटनाला जातो, गड किल्ल्यांना भेटी देतो, सागराच्या लाटांवर स्वार होतो, या सगळ्या स्थळांची माहिती जाणून घेणं, त्याचा इतिहास समजून घेणंही आपल्याला आवडतं. अशा वेळी आपल्या मदतीला येतात ते पर्यटक मार्गदर्शक म्हणजे “गाईड”! पुरुषांची मक्तेदारी असलेल्या या क्षेत्रात महिलांनी कधीच शिरकाव केला असला तरी घनदाट जंगलात पर्यटकांना घेऊन जाणं, त्यांची सुरक्षितता जपतांना त्यांना त्या […]

InShortsMarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. महिला ‘गाईड’ सांगताहेत वाघोबाच्या साम्राज्याची गोष्ट! ताडोबा-अंधारी, मेळघाट आणि पेंच व्याघ्र प्रकल्पात महिला गाईड InShorts Marathi.

]]>

आपण वन पर्यटनाला जातो, गड किल्ल्यांना भेटी देतो, सागराच्या लाटांवर स्वार होतो, या सगळ्या स्थळांची माहिती जाणून घेणं, त्याचा इतिहास समजून घेणंही आपल्याला आवडतं. अशा वेळी आपल्या मदतीला येतात ते पर्यटक मार्गदर्शक म्हणजे “गाईड”! पुरुषांची मक्तेदारी असलेल्या या क्षेत्रात महिलांनी कधीच शिरकाव केला असला तरी घनदाट जंगलात पर्यटकांना घेऊन जाणं, त्यांची सुरक्षितता जपतांना त्यांना त्या वनाची, तिथल्या जैव विविधतेची संपूर्ण आणि अचूक माहिती देणं हे जरा हटके काम स्वीकारलं आहे, राज्यातील व्याघ्र प्रकल्प क्षेत्रातील स्थानिक युवतींनी..! या वेगळ्या वाटेवरून जाताना त्यांनी स्वावलंबनाचा मार्ग तर चोखाळला आहेच परंतु निसर्ग रक्षणाच्या कामात योगदानही दिले आहे.

राज्यात बोर, मेळघाट, पेंच, नवेगाव-नागझिरा, सह्याद्री आणि ताडोबा- अंधारी असे सहा व्याघ्र प्रकल्प आहेत. यापैकी ताडोबा-अंधारी, मेळघाट आणि पेंच व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांसोबत जंगल भ्रमंती करताना या महिला गाईड सांगत आहेत तिथे अधिवास करणाऱ्या वाघोबाच्या साम्राज्याची गोष्ट, घडवताहेत तिथल्या जैव विविधतेचे दर्शन. मेळघाट व्याघ्र प्रकल्पात ३०, पेंच व्याघ्र प्रकल्पात १२ आणि ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात ५ महिला गाईड कार्यरत आहेत. त्यामुळे तुम्ही जर कधी मेळघाट, पेंच किंवा ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला भेट दिली आणि महिला “गाईड” तुम्हाला या जंगलाची ओळख करून देतांना दिसल्या तर आश्चर्य वाटायला नको…

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान नियामक मंडळाच्या बैठकीत ही माहिती देण्यात आली. व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात तसेच वनालगतच्या गावांमध्ये स्थानिक महिलांना विविध व्यवसाय- उद्योगाचे प्रशिक्षण देऊन त्यांचे सक्षमीकरण केले जात आहे. त्याचाच हा एक भाग आहे. अचूक आणि परिपूर्ण माहितीने समृद्ध गाईड आलेल्या पर्यटकाला जंगलभ्रमंतीचा उत्तम आनंद देऊ शकतो हे विचारात घेऊन या वन पर्यटक मार्गदर्शकांना प्रशिक्षण दिले गेले आहे.

पर्यटनाला आलेल्या पर्यटकांशी सौजन्याने बोलणे, त्यांना जंगल भ्रमंतीचे नियम समजून सांगणे, जंगलात गेल्यानंतर कसे वागायचे हे शिकवणे, व्याघ्र प्रकल्पाची माहिती देताना वाघांबरोबरच इतर वन्यजीव आणि वृक्षसंपदेने संपन्न असलेल्या वनाची ओळख करून देणे, वन्यजीवांची माहिती देणे, त्या जंगलातील पशू पक्षी आणि प्राण्यांचा असलेला वावर सांगणे यासारख्या गोष्टींमधून पर्यटकाला पर्यटनाचा पुरेपूर आणि भरपूर आनंद मिळेल अशी वर्तणूक करणे यादृष्टीने या महिला पर्यटन मार्गदर्शकांना तयार करण्यात आले आहे. दिल्या जाणाऱ्या माहितीमध्ये एकवाक्यता आणि एकसूत्रता राहील याची काळजी घेतली गेली आहे.

प्रशिक्षण, रोजगार संधी आणि उत्पन्न वृद्धी ही स्थानिकांच्या विकासाची त्रिसूत्री- सुधीर मुनगंटीवार

पक्ष्यांचे संगीत आणि वाघाच्या डरकाळ्यांनी व्याघ्र प्रकल्पातील डोंगर रांगा जिवंत होतात असं म्हटलं जातं. याच डोंगर रांगात वसलेल्या, व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात, वनालगतच्या गावात राहणाऱ्या स्थानिक लोकांनी ही वने जिवंत ठेवण्यासाठी आणि वाढण्यासाठी मोठे योगदान दिले आहे. अशा वेळी या लोकांना रोजगाराच्या पर्यायी संधी उपलब्ध करून देणे, त्या दृष्टीने आवश्यक असलेले प्रशिक्षण देणे, अत्यावश्यक पायाभूत सुविधा या गावांमध्ये उपलब्ध करून देणे आणि त्यांचे वनांवरचे अवलंबित्व कमी करणे यासाठी वन विभागाने पुढाकार घेतला आहे. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेतून या कामाला गती देण्यात आली आहे. पर्यटक मार्गदर्शक, महिलांसाठी शिलाई मशिन युनिट, दुभत्या पशुधनाचे वाटप, होम स्टे, वाहनचालक, ऑटोमोबाईल प्रशिक्षण अशा विविध माध्यमातून स्थानिकांचे सक्षमीकरणाचे काम सुरु आहे. यासाठी आपण आय.टी.सी सारख्या अनेक संस्थांची मदत घेतली आहे. महिला वन पर्यटक मार्गदर्शक हा त्यातीलच एक नाविन्यपूर्ण उपक्रम आहे अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या –

एक सेल्फी तर हवाच

पर्यटकांना व्याघ्र प्रकल्पात घेऊन जातांना सुरुवातीला आम्ही एकमेकांशी नवखे असलो तरी एका प्रवासात आमची त्या कुटुंबासोबत मैत्री होते आम्ही त्यांच्या कुटुंबापैकीच एक होऊन जातो. वाघ पाहिल्यानंतर पर्यटकांचा आनंद किती विलक्षण असतो याची आम्हाला अनुभूती होते. वाघाशिवाय दिसणाऱ्या इतर वन्यजीवांना पाहून ही पर्यटक हरखून जातात. पर्यटकांचा रानवाटांवरचा हा प्रवास अधिकाधिक सुखद आणि सुरक्षित होईल याची आम्ही काळजी घेतो, पर्यटक जेव्हा परतीच्या प्रवासाला निघतात तेव्हा ज्या गाईडमुळे त्यांची व्याघ्र प्रकल्पातील सहल अविस्मरणीय झाली त्यांच्याबरोबर एक सेल्फी तर हवाच ही त्यांची मागणी आम्हालाही आनंद देऊन जात असल्याची प्रतिक्रिया पी.ए बोरजे या महिला पर्यटक मार्गदर्शकाने दिली.

InShortsMarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. महिला ‘गाईड’ सांगताहेत वाघोबाच्या साम्राज्याची गोष्ट! ताडोबा-अंधारी, मेळघाट आणि पेंच व्याघ्र प्रकल्पात महिला गाईड InShorts Marathi.

]]>
68091
राज्य उत्पादन शुल्क विभागातील सेवा ऑनलाईन – चंद्रशेखर बावनकुळे https://inshortsmarathi.com/chandrashekar-bavankule/ Wed, 29 May 2019 12:57:44 +0000 https://inshortsmarathi.com/?p=68078 chandrashekar Bavankule1

मद्य निर्मिती व वि‍क्रीबाबत लागणारे परवाने आणि सेवा ऑनलाईन करण्यासाठी कामकाजाचे सुलभीकरण व अधिकारांचे विकेंद्रीकरण करण्यात आले आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत श्री. बावनकुळे बोलत होते. श्री. बावनकुळे म्हणाले, मेक इन इंडिया धोरणाअंतर्गत कामकाज सुलभीकरण (ease of doing business) पद्धतीही राबविण्यात येत आहे. यासाठी 30 […]

InShortsMarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. राज्य उत्पादन शुल्क विभागातील सेवा ऑनलाईन – चंद्रशेखर बावनकुळे InShorts Marathi.

]]>
chandrashekar Bavankule1

मद्य निर्मिती व वि‍क्रीबाबत लागणारे परवाने आणि सेवा ऑनलाईन करण्यासाठी कामकाजाचे सुलभीकरण व अधिकारांचे विकेंद्रीकरण करण्यात आले आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत श्री. बावनकुळे बोलत होते.

श्री. बावनकुळे म्हणाले, मेक इन इंडिया धोरणाअंतर्गत कामकाज सुलभीकरण (ease of doing business) पद्धतीही राबविण्यात येत आहे. यासाठी 30 जून 2018 ला प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय समिती गठित करण्यात आली होती. या समितीने मद्य निर्मिती व विक्री या अंतर्गत काम करणाऱ्या व्यापारी संस्था, हॉटेल चालक, किरकोळ व घाऊक मद्य विक्रेते यांच्याशी चर्चा केली.

या उद्योजकांना दररोजचे कामकाज आणि सेवांमध्ये येणाऱ्या अ‍डचणी लक्षात घेता कामकाज सुलभीकरण आणि पारदर्शक कसे करता येईल यासाठीचे उद्योजकांचे प्रस्ताव मागविले होते. त्यानंतर समितीने अहवाल सादर केला आहे. कामकाज सुलभीकरणाची ही पद्धत राज्य उत्पादन शुल्क विभागाने यशस्वीपणे राबवली आहे. त्यामुळे किरकोळ परवान्यासारख्या कामांना लागणाऱ्या वेळेची बचत होत आहे.

आता प्रत्येक कामासाठी मुख्यालयात येण्याची आवश्यकता नाही. जिल्हा स्तरावरच अनेक कामे करता येतात. हॉटेल उद्योगाला लागणारे परवाने ऑनलाईन झाले व निर्णय प्रक्रिया कालबध्द करण्यात आली. मद्यनिर्मिती व मद्यविक्री स्वयंचलित प्रणालीद्वारे नियंत्रित केली जात आहे, असेही श्री. बावनकुळे यांनी सांगितले.

महाऑनलाईनच्या माध्यमातून हे काम करण्यात येत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे देण्यात येणारे विविध परवाने व अनुज्ञप्त्या ऑनलाईन देण्यात येतात. यामुळे परवान्यांसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची संख्या कमी झाली असून परवाना पद्धती सुलभ झाली आहे.

मद्य निर्मिती उद्योगास लागणारे परवाने, उद्योगांमध्ये ओव्हर टाईम करण्यास परवानगी, एका पाळीतील काम दोन पाळ्यांमध्ये, कामगारांसाठी मंजुरी व क्षेत्रफळ मंजुरीची कामे आता स्थानिक पातळीवरच केली जातात. यामुळे उद्योजकांना मुख्यालयाच्या कामकाजाकरिता यावे लागणार नाही. यात मळी वाहतूक परवानगी, निर्यात परवानगी याचा समावेश करण्यात आला आहे.

पुनर्विकासात गेलेल्या इमारतीमधील उपाहारागृह अनुज्ञप्तींसाठी उदारमतवादी धोरण या विभागाने अवलंबविले आहे. ह्या अनुज्ञप्ती (लायसन्स) बंद असलेल्या काळात फक्त 10 टक्के अनुज्ञप्ती शुल्क घेण्यात येते. यापूर्वी ते पूर्ण घेण्यात येत होते. प्रत्येक सेवेसाठी सोपी पद्धती अंमलात आणली जात असून सेवा हमी कायद्याअंतर्गत कालबद्ध कालावधीत सर्व सेवा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न या विभागातर्फे करण्यात येत असल्याचे श्री. बावनकुळे यांनी सांगितले.

विक्रमी महसूल प्राप्ती

सन 2018-19 या वर्षात राज्य उत्पादन शुल्क विभागाला 15 हजार 323 कोटी रू. व विक्री कराच्या स्वरूपात सुमारे 10 हजार कोटी रू. असा एकूण 25 हजार 323 कोटी रुपये विक्रमी महसूल प्राप्त झाला आहे. सन 2016-17 मध्ये महसूलात 10 टक्के, 2017-18 मध्ये 9 टक्के व 2018-19 मध्ये 16.5 टक्के महसूल वाढ झाली आहे. कामकाजात करण्यात आलेल्या सुलभीकरणामुळेही महसूल वाढला आहे.

विभागाच्या नियमानुसार विविध नोंदवह्या कमी करुन लेख्यांचे प्रमाण कमी करण्यात आले आहे. तसेच विविध प्रकारची विवरण पत्रे ऑनलाईन प्रणालीने विकसित करण्यात येत आहे. तसेच मद्यार्क निर्मितीसाठीची पूर्व परवानगीची अट शिथिल करण्यात आली. आंतर जिल्हा मळी वाहतुकीसाठी लागणाऱ्या परवानगीची बंधने कमी करण्यात आली. मुंबई शहर व उपनगरे या जिल्ह्यामधील ठराविक अनुज्ञप्तांचे प्रायोगिक तत्वावर ऑनलाईन पद्धतीने नूतनीकरण करण्यात आले असल्याचेही श्री. बावनकुळे यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या –

InShortsMarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. राज्य उत्पादन शुल्क विभागातील सेवा ऑनलाईन – चंद्रशेखर बावनकुळे InShorts Marathi.

]]>
68078
…तर संभाजीनगरवर हिरवे फडके कधीच फडकले नसते- शिवसेना https://inshortsmarathi.com/shivsena-samna-comment-on-aurangabad-sambhajinagar/ Sun, 26 May 2019 12:59:38 +0000 https://inshortsmarathi.com/?p=68064

महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकर हे हैदराबादचे ओवेसी यांच्यासह वंचित बहुजन आघाडी निर्माण करून निवडणुकीत उतरले, पण सात-आठ मतदारसंघ वगळता त्यांना मतदान झाले नाही. संभाजीनगरात वंचित आघाडीच्या इम्तियाज जलील यांचा विजय हा अपघात आहे. आमदार हर्षवर्धन जाधव यांनी या मतदारसंघात हिंदू मतांमध्ये फूट पाडून लाखभर मते वळवली. हे घडले नसते तर संभाजीनगरवर हिरवे फडके कधीच फडकले नसते. […]

InShortsMarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. …तर संभाजीनगरवर हिरवे फडके कधीच फडकले नसते- शिवसेना InShorts Marathi.

]]>

महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकर हे हैदराबादचे ओवेसी यांच्यासह वंचित बहुजन आघाडी निर्माण करून निवडणुकीत उतरले, पण सात-आठ मतदारसंघ वगळता त्यांना मतदान झाले नाही. संभाजीनगरात वंचित आघाडीच्या इम्तियाज जलील यांचा विजय हा अपघात आहे.

आमदार हर्षवर्धन जाधव यांनी या मतदारसंघात हिंदू मतांमध्ये फूट पाडून लाखभर मते वळवली. हे घडले नसते तर संभाजीनगरवर हिरवे फडके कधीच फडकले नसते. महाराष्ट्रातून, खास करून संभाजीनगरातून ‘ओवेसी’ यांच्या पक्षाचा खासदार निवडून जावा हे दुर्दैव आहे.

संपूर्ण देशात हिंदुत्वाची लाट उसळली, पण महाराष्ट्रात संभाजीनगर हरले व औरंगाबाद जिंकले. हा धक्का आहे. असं म्हणत शिवसेनेनं सामना संपादकीयातून आपली नाराजी व्यक्त केली आहे.

सामना संपादकीय

नरेंद्र मोदी विजयी होणार असे ज्यांना वाटत होते त्यांनीही आश्चर्यचकित व्हावे असे अफाट, अभूतपूर्व आणि अलौकिक यश भाजपसह ‘एनडीए’ने संपादन केले आहे. 2014 साली मोदी जिंकलेच होते, पण त्या विजयात मनमोहन सिंग व राहुल गांधींचा वाटा जास्त होता. काँग्रेसचे बदनाम नेतृत्व व मनमोहन सरकार कुचकामी ठरल्यामुळे लोकांनी मोदी यांना संधी दिली. यावेळी ते चित्र नव्हते. मोदी यांनी पाच वर्षे सत्ता राबवली. त्यामुळे त्यांची लढाई स्वतःशीच होती, पण मोदींनी मिळविलेले यश हे 2014 च्या त्यांच्याच यशापेक्षाही मोठे आहे आणि हे यश त्यांनी केवळ स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाच्या आणि अथक परिश्रमाच्या जोरावर मिळविलेले आहे. हा मोदी यांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रचंड विजय आहे. असे यश याआधी फक्त इंदिरा गांधी यांनाच मिळाले होते.

उत्तर प्रदेशची मक्तेदारी संपली

फक्त उत्तर प्रदेशच हिंदुस्थानचा पंतप्रधान ठरवेल ही समजूत आणि अंधश्रद्धा या निवडणूक निकालाने उद्ध्वस्त केली. उत्तर प्रदेशने मोठे यश दिले नसते तरी संपूर्ण देशाने मतदान करून मोदी यांना पंतप्रधानपदावर कायम ठेवले असते. मुसलमान-यादव व दलित मतांची बेरीज अखिलेश व मायावती यांच्या महाआघाडीमुळे मजबूत होईल व भारतीय जनता पक्षाची उत्तरेत पीछेहाट होईल असे गणित मांडले गेले होते, पण उत्तरेत नेमके उलट घडले. कनोज या यादवांच्या बालेकिल्ल्यात अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव पराभूत झाल्या आहेत. उत्तर प्रदेशात, राजस्थानात, मध्य प्रदेशात काँग्रेसचा दारुण पराभव झाला. लोकांनी जात व धर्माच्या आघाडय़ा मोडून मोदी यांना मतदान केले. महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकर हे हैदराबादचे ओवेसी यांच्यासह वंचित बहुजन आघाडी निर्माण करून निवडणुकीत उतरले, पण सात-आठ मतदारसंघ वगळता त्यांना मतदान झाले नाही. संभाजीनगरात वंचित आघाडीच्या इम्तियाज जलील यांचा विजय हा अपघात आहे. आमदार हर्षवर्धन जाधव यांनी या मतदारसंघात हिंदू मतांमध्ये फूट पाडून लाखभर मते वळवली. हे घडले नसते तर संभाजीनगरवर हिरवे फडके कधीच फडकले नसते. महाराष्ट्रातून, खास करून संभाजीनगरातून ‘ओवेसी’ यांच्या पक्षाचा खासदार निवडून जावा हे दुर्दैव आहे. संपूर्ण देशात हिंदुत्वाची लाट उसळली, पण महाराष्ट्रात संभाजीनगर हरले व औरंगाबाद जिंकले. हा धक्का आहे.

‘किंगमेकर्स’ पराभूत

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू व तेलंगणाचे मुख्यमंत्री के. सी. चंद्रशेखर राव यांना ‘किंगमेकर’ म्हणून भूमिका बजावायची होती. मात्र स्वतः चंद्राबाबू हे विधानसभा गमावून बसले व लोकसभेतही त्यांचा पक्ष हरला. आंध्रची विधानसभा वाय.एस.आर. काँग्रेसने जिंकली. आंध्रात लोकसभेच्या 25 पैकी 24 जागा जगन यांच्या वाय.एस.आर. काँग्रेसने जिंकल्या. तेथे भाजपचाही पराभव झाला. तेलंगणात चंद्रशेखर राव यांच्या पक्षाला 17 जागा मिळतील व त्या बळावर आपण दिल्लीच्या सत्तेत किंगमेकर होऊ असे स्वप्न ते पाहत होते. तेथे त्यांना आठ जागा मिळाल्या. या निवडणुकीच्या निकालाचे वैशिष्टय़ असे की, मतदारांनी ‘थेट’ राजा निवडला. किंगमेकरची भूमिका कुणावरच ठेवली नाही. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील शिवसेना, जनता दल युनायटेड व रामविलास पासवान यांना चांगले यश मिळाले, पण भारतीय जनता पक्षालाही पूर्ण बहुमताचा आकडा मिळाला आहे. हे 2014 साली झाले व 2019 साली दुसऱयांदा झाले. दक्षिणेतील केरळ, तामीळनाडू आणि आंध्र प्रदेश या राज्यांत मोठे यश मिळाले नाही, पण उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, कर्नाटक ही राज्ये ठामपणे मोदींच्या मागे उभी राहिली. दिल्ली, हरयाणा, उत्तराखंड ही लहान राज्येही शंभर टक्के मोदींनाच सर्व खासदार देऊन गेली. मोदींच्या लाटेत पुन्हा अनेक जण तरले. 2014 सालचीच ही पुनरावृत्ती. मतदारांनी उमेदवार पाहिले नाहीत, मोदींकडे पाहिले. ‘कमळा’वर बटन दाबा. मत सरळ मलाच मिळेल! हा मोदींचा संदेश देशाने स्वीकारला.

जनादेश

लोकसभा निवडणुकीचा निकाल हा स्पष्ट जनादेश आहे. त्यावर चर्चा करून काय फायदा? विरोधकांची एकजूट किती पोकळ होती हे पुन्हा दिसले. दिल्लीत आप आणि काँग्रेस एकत्र येऊ शकले नाहीत. प. बंगालात काँग्रेस आणि तृणमूल एका व्यासपीठावर आले नाहीत. उत्तर प्रदेशात मायावती व अखिलेश यादव यांचे महागठबंधन झाले. त्यात काँग्रेसला घेण्यास मायावती यांनी विरोध केला. आंध्रात तेलगू देसम आणि काँग्रेसचे जमले नाही. कर्नाटकात काँग्रेस व जनता दल यांची सत्ता. तेथेही लोकसभेत त्यांचे सूर जुळले नाहीत. माझाच विरोधी पक्ष खरा, असा वेगळा झेंडा घेऊन प्रत्येक जण उभा राहिला. याउलट भाजपच्या फौजा व एनडीएचे घटक दल एकदिलाने लढले. ज्या राज्यात काँग्रेसची सरकारे आहेत तेथे अंतर्गत गटबाजीने उरलेसुरले पडके वाडेही उद्ध्वस्त केले. काँग्रेस पक्षात आजही एका घराण्याचीच सरंजामशाही आहे, पण राहुल किंवा प्रियंका गांधी म्हणजे पंडित नेहरू, इंदिरा गांधी नव्हेत. ही मुले वाईट आहेत असे म्हणायचे नाही, पण देशाचे नेतृत्व करायला व काँग्रेसला पुढे घेऊन जायला सक्षम आहेत काय, हा प्रश्न आहे. पंतप्रधानांना ‘चोर’ म्हणून मतदारांवर प्रभाव टाकता येणार नाही व जोपर्यंत पक्षात नवीन कार्यकर्ते निर्माण होणार नाहीत तोपर्यंत ‘सत्ता’ सोडाच, पण विरोधी पक्ष म्हणूनही उभे राहता येणार नाही, हा धडा राहुल गांधी यांनी घ्यायला हवा. राहुल गांधी स्वतः अमेठीत पराभूत झाले. 20 वर्षे हा मतदारसंघ गांधी घराण्याकडे आहे. एखादा उद्योग सोडा, पण बऱयापैकी हॉटेलही तेथे उभे राहू शकले नाही. बाहेरून आलेल्या लोकांना बाजूच्या सुलतानपूरमधे जावे लागते, असे तेथे जाऊन आलेल्या पत्रकारांनी सांगितले. इंदिरा गांधी व संजय गांधी यांच्या अमेठीचे नव्या पिढीशी भावनिक नाते उरलेले नाही व राहुल गांधी यांचा प्रभाव कमी होत गेला. मोदी यांच्या लाटेचा तडाखा त्यामुळे अमेठीत त्यांना बसला. आता कुणाचेही गड आणि बालेकिल्ले हे कायमस्वरूपी नाहीत हे महाराष्ट्रात आणि इतरत्र दिसून आले. मोदी विजय हा त्यांचा स्वतःचा आहे. निर्विवाद आहे.

विरोधकांनी तो स्वीकारायला हवा.

महत्त्वाच्या बातम्या –

InShortsMarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. …तर संभाजीनगरवर हिरवे फडके कधीच फडकले नसते- शिवसेना InShorts Marathi.

]]>
68064