InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Category

Articles

आर. के. लक्ष्मण यांचे काम ‘टाईमलेस’ राहील – नरेंद्र मोदी

आर. के. लक्ष्मण यांनी व्यंगचित्राद्वारे केलेले काम ‘टाईमलेस’ राहील, असे गौरवोद्गार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काढले. व्यंगचित्रकार म्हणून आंतरराष्ट्रीय कीर्तीप्राप्त दिवंगत आर. के. लक्ष्मण अर्थात रासीपुरम कृष्णस्वामी लक्ष्मण यांच्या कारकीर्दीवर आधारित 'टाईमलेस लक्ष्मण' पुस्तकाचे प्रकाशन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज राजभवन येथे करण्यात आले आहे.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले, आर. के. लक्ष्मण यांनी त्यांच्या व्यगंचित्रातून राष्ट्रीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक,…
Read More...

आज विजय दिवस; ‘जरा याद करो कुर्बानी’!

आज १६ डिसेंबर असून देशभर आजचा दिवस 'विजय दिवस' म्हणून साजरा करण्यात येतो. आजच्या दिवशी १९७१ च्या पाकिस्तानवरील ऐतिहासिक विजयाचे प्रतीक म्हणून 'विजय दिवस' साजरा करण्यात येतो.१६डिसेंबर १९७१ रोजी भारताने युद्धात पाकिस्तानला धूळ चारली होती. याच दिवशी ढाक्यात पाकिस्तानी सैन्याचे नेतृत्व करणाऱ्या ले. जनरल ए. के. नियाजी यांच्यासमोर तब्बल ९३ हजार पाकिस्तानी सैनिकांनी आत्मसमर्पण करुन पराभव मान्य केला होता.युद्धादरम्यान १२ दिवसात अनेक भारतीय जवान शहीद तर कित्येक जखमी झाले होते. या युद्धानंतरच…
Read More...

बारा बाराला वाढदिवस असणाऱ्या शरद पवार यांच्याबद्दलच्या बारा गोष्टी

महाराष्ट्राचा राजकीय इतिहास शरद पवार या नावाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. त्याला कारणही तसेच आहे . मागची जवळपास पन्नास वर्षे महाराष्ट्रातल्या राजकारणात शरद पवार यांचं महत्वाचं स्थान राहिलेलं आहे . एक सर्वसाधारण कार्यकर्ता, आमदार, मंत्री, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि प्रधानमंत्री पदाचा दावेदार असा मोठा राजकीय प्रवास आहे. आज १२ डिसेंबर, शरद पवार यांचा वाढदिवस. त्यानिमित्ताने शरद पवार यांच्याबद्दलच्या काही गोष्टी…1. शारदाबाई गोविंदराव पवार या शरद पवार यांच्या मातोश्री. त्या…
Read More...

आर आर आबा माझ्यासाठी कोण होता…. असे म्हणत शरद पवार घळाघळा रडू लागले

आर आर माझ्यासाठी कोण होता.... असे म्हणत शरद पवार घळाघळा रडू लागले...! आर. आर. आबा यांच्या कन्या स्मिता पाटील- थोरात यांनी सांगितली 'ती' आठवण
Read More...

गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवारमधून पाण्याचा प्रत्येक थेंब अडविण्याचा प्रयत्न

राज्यातील छोटी धरणे, तलाव यामधील गाळ काढून तो शेतात टाकल्यावर कृषी उत्पादनात वाढ होताना दिसून आले आहे. त्यामुळे या वर्षी ‘गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजने’च्या माध्यमातून 15 हजार छोट्या मोठ्या धरण आणि तलावातील गाळ काढण्याचे उद्दिष्ट ठेवावे. पाण्याचा प्रत्येक थेंब मौल्यवान असल्याने तो अडविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. भविष्यात पाऊस कमी झाला तरी दुष्काळाचे चटके राज्याला जाणवणार नाही आणि हीच खरी दुष्काळमुक्तीची संकल्पना असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. या योजनेसाठी…
Read More...

आयुर्वेदीय जीवनशैली आरोग्याची गुरुकिल्ली

आहारजीवनशैलीत आहाराला खूपच महत्त्व आहे, कारण आहारातूनच आपले शरीर बनत असते.आहारसंभवं वस्तु रोगाश्च आहारसंभवाःअर्थात रोगांची निर्मितीही आहारातूनच होत असते. दुर्दैवानेआहाराच्या इतक्या चुकीच्या सवयी समाजात रूढ झाल्या आहेत, आणि समाजात त्याबाबतअजिबातच जागरुकता नाही. आधुनिक वैद्यकात पथ्यापथ्य संकल्पनेला पूर्ण फाटाच मिळाल्याने खाण्यापिण्याच्या सवयी पार बदलून गेल्या आहेत. प्रथम आहाराच्या मानसिकते विषयी विचार करू.आहार घेण्यामागची मानसिकताभूक लागली म्हणून खाणे –  ही खाण्याची…
Read More...

वंध्यत्व म्हणजे काय ? वंध्यत्वाची समस्या किती जोडप्यांमध्ये असते? मुल होण्यासाठी किती वर्षे वाट…

वंध्यत्व म्हणजे काय ?मुल न होण्याचा अवस्थेला वंध्यत्व असे म्हणतात. ज्या स्त्रीला एकदाही दिवस गेले नाहीत त्या वंध्यत्वाच्या प्रकाराला प्रायमरी इन्फर्टीलिटी म्हणतात व ज्या स्त्रीला एकदा मुल झाले असताना , पुन्हा दिवस राहत नसतील तर त्या वंध्यत्वाच्या प्रकारला सेकंडरी इन्फर्टीलिटीअसे म्हणतात.वंध्यत्वाची समस्या किती जोडप्यांमध्ये असते?स्त्री आणि पुरुष यांच्यात लैंगिक संबंधातून गर्भाची निर्मिती होते. हाच गर्भ स्त्रीच्या गर्भाशयात रुजतो, वाढतो व ९ महिन्यानंतर बाळाच्या जन्म होतो. ह्या अगदी…
Read More...

लेख- जात जपणारे तर जातींचे संगोपन करताहेत पण जात मोडायला निघालेलेही जात जपताहेत

प्रा. डॉ.सुधीर गव्हाणे – मार्च महिना सुरू झाला की, प्रज्ञापुरूष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे वेध लागायला सुरूवात होते. अलीकडे १४ एप्रिल बरोबर सर्वांना ११ एप्रिल या महात्मा जोतीबा फुले यांच्या जयंतीचीही आस लागते आहे, हे फ़ार चांगले लक्षण आहे. सामाजिक समतेच्या या लढवय्यांचे योगदान युगकर्तेपणाचे आहे हे कोणी नाकारू शकत नाही. सयाजीराव गायकवाड महाराज आणि राजर्षि शाहू महाराज या कडवट समता कृतिवंतांना कसे विसरता येईल ? सत्ता कशासाठी असते आणि ती कुणासाठी वापरावी याचा आदर्श हे राजे होते. आजचे व…
Read More...

आझाद मैदानावरील जगाचा पोशिंदा सकाळपासून उपाशी

विविध मागण्यांसाठी शेतकरी आणि आदिवासींनी काढलेला 'उलगुलान मोर्चा' मुंबईतील आझाद मैदानात दाखल झाला आहे. आंदोलकांचा आझाद मैदानात ठिय्या सुरु आहे. मात्र आंदोलक सकाळपासून उपाशी आहेत. आंदोलनस्थळी जेवणाची व्यवस्था केलेली नाही. तर काहींनी मागण्या मान्य होईपर्यंत जेवण न करण्याचा निश्चय केला आहे.दरम्यान आंदोलनाचं नेतृत्त्व करणाऱ्या प्रतिभा शिंदे यांच्यासह 18 जणांचं शिष्टमंडळ दुपारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आपल्या मागण्या त्यांच्यासमोर मांडणार आहेत. या शिष्टमंडळात प्रतिभा…
Read More...

‘देअर यू आर’ भैयासाहेब

झी मराठी वरील  'लागिरं झालं जी' मालिकेबरोबरच त्यातील पात्रही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. आज्या, शितली, जयडी, राहुल्याप्रमाणेच भैयासाहेब ही व्यक्तिरेखा लोकांनी डोक्यावर घेतलीय. प्रेक्षकही म्हणतायत 'देअर यू आर' भैयासाहेब.नायकाप्रमाणेच खलनायकाची भूमिकाही महत्वाची असते. अशाच काही खलनायकांच्या भूमिका लोकांच्या मनात घर करून जातात. असच किरण गायकवाड उर्फ 'भैयासाहेब' याने आपल्या भूमिकेने लोकांचे लक्ष वेधून घेतले. तर या भैय्यासाहेबांचा प्रवास कसा झाला आणि ते लागीर झालं जी पर्यंत कसे पोहचले?…
Read More...